IFFI 2022 | Goa Dainik Gomantak
गोवा

IFFI 2022: 'हादीनेलेंतू'ने उघडणार इंडियन पॅनोरमा

IFFI 2022: महोत्सवात सर्वाधिक मराठी सिनेमांची परंपरा कायम राखली आहे.

दैनिक गोमन्तक

IFFI 2022: पणजीत होणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इफ्फी (IFFI) ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म आणि 20 नॉन फिचर चित्रपटांची घोषणा काल महोत्सव संचालनालयाने केली. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या इफ्फीत पाच मराठी, तर एका कोकणी चित्रपटाचा सहभाग आहे.

‘इंडियन पॅनोरमा’तील उद्‍घाटनाचा चित्रपट म्हणून पृथ्वी कोनानूर दिग्दर्शित ‘हादीनेलेंतू’ या कन्नड चित्रपटाची निवड केली आहे. अलीकडे केंद्र सरकारच्या (Central Government) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीने (एनएफडीसी) ‘इंडियन पॅनोरमा’चे आयोजन केले जाते.

‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असणारे सिनेमे सिनेजगतातील नामवंत व्यक्तींमार्फत निवडले जातात. यंदा ‘फीचर फिल्म’ परीक्षकांचे नेतृत्व प्रख्यात दिग्दर्शक आणि संपादक विनोद गणात्रा यांनी केले. याशिवाय सि ए. कार्तिक राजा, आनंद ज्योती, डॉ. अनुराधा सिंह, अशोक कश्यप, एनुमुला प्रेमराज, गीता एम. गुरप्पा, इमो सिंग आदींचा सिनेमा परीक्षण सदस्यांत समावेश होता.

'फिचर फिल्म'मध्ये पाच मराठी चित्रपट

‘फिचर फिल्म’मध्ये यंदा एकूण 354 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 25 चित्रपटांची निवड झाली. त्यात ‘धर्मवीर...’, ‘मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘फ्रेम’, ‘शेर शिवराज’, ‘एकदा काय झालं’ या पाच मराठी चित्रपटांची निवड झाली आहे.

'नॉन फिचर फिल्म' मध्ये 'वाग्रो'

'नॉन फिचर फिल्म' मध्ये यंदा एकून 242 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली. यात 'वाग्रो' या कोकणी, तर 'रेखा' या मराठी सिनेमाची निवड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT