Kokan Movie Dainik Gomantak
गोवा

Kokan Movie: 'कोकणी' सिनेमाची वेगळेपण हीच खरी ओळख

Kokan Movie: सहित स्टुडिओ निर्मित 'अर्दो दीस'च्या पोस्टरचे पणजीत अनावरण करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Entertainment News: कोकणी सिनेमांमध्ये सुरुवातीपासूनच वैविध्यपूर्ण प्रयोग होत आहेत. आणि हे प्रयोगच भविष्यामध्ये कोकणी सिनेमाचे वेगळेपण ठरेल आणि त्यातूनच भारतीय सिनेसृष्टीमध्ये कोकणी सिनेमा आपले स्वतःचे असे स्थान निर्माण करेल.

दरम्यान, यामध्ये गोव्यात सध्या सिनेक्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा पिढीचा मोठा वाटा असेल, असा विश्वास राज्याचे कला आणि संस्कृती तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केला. सहित स्टुडिओ निर्मित ‘अर्दो दीस’ या कोकणी लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण पणजीत अनौपचारिक कार्यक्रमामध्ये केल्यानंतर ते बोलत होते.

तसेच, यावेळी ‘अर्दो दीस’चे निर्माते आणि लेखक किशोर अर्जुन, दिग्दर्शक हिमांशू सिंग, छायाचित्रकार अश्विन चिढे, कला संयोजक पंकज कटवारे, यांच्यासोबत रोहित खांडेकर, क्षितिजा गावकर यांची उपस्थिती होती. या लघुपटामध्ये गोमंतकीय कलाकार उगम जांबवलीकर आणि रावी किशोर यांची प्रमुख भूमिका आहे.

हिमांशू सिंग, लघुपट दिग्दर्शक-

ही कलाकृती सगळ्या कलाकारांना अर्पित आहे. कारण यामध्ये आम्ही कलाकारांच्या जगण्याचा वेध घेतलेला आहे. कलाकार म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यापूर्वी या कलाकाराला किती प्रकारच्या जगण्यातून जावे लागते, हे ‘अर्दो दीस’मध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसणार आहे. ‘अर्दो दीस’ आता पूर्ण झाला असून, विविध आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT