Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: खोर्ली-ओल्ड गोवा येथे परप्रांतीयाची हत्या; पोलीस घटनास्थळी दाखल

Goa Crime Case: वर्षाचा शेवटचा दिवस खून, अपघात, चोऱ्या यांसारख्या घटनांमुळे गाजला

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: खोर्ली ओल्ड गोवा येथे एका परप्रांतीयाची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर येतेय. ही व्याकळती आसामची असून सध्या भाडेतत्वावर खोली घेऊन ते खोर्ली ओल्ड गोवा येथे राहत असल्याचे समजतेय.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

वर्षाचा शेवटचा दिवस खून, अपघात, चोऱ्या यांसारख्या घटनांमुळे गाजला असून खोर्ली येथे झालेल्या या प्रकारानंतर गोव्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसून येतोय.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यात देश-विदेशीचे पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या वाहनांची संख्याही वाढली असून वाहतूक कोंडी, रस्ते अपघातांसारखे प्रकार घडत आहेत.

कुंक्कळी आणि म्हापसा-शिवोली मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

कळंगुट येथील समुद्रकिनाऱ्यावर बाटल्या फेकल्याच्या आरोपावरून पर्यटक आणि जीवरक्षकांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचा प्रकारही रविवारी गोव्यात पाहायला मिळाला.

येणारे पर्यटक बेशिस्तपणे वागू लागल्यावर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क राहून त्यांच्यावर कारवाई करत असल्याचे चित्रही काही ठिकाणी पाहायला मिळतेय.

एकूणच वर्षाचा शेवटचा दिवस गुन्ह्याच्या घटनांनी गाजला अशी सर्वसामान्यांनी प्रतिक्रिया दिलीय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT