Goa Kala Academy ceiling collapse Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Kala Academy Ceiling Collapse: विधानसभेत या विषयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. सध्‍या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्‍याने पुन्हा एकदा विरोधकांना विषय मिळाला आहे.

Sameer Panditrao

पणजी : समस्‍यांचे ‘ग्रहण’ लागलेल्‍या कला अकादमीच्या व्हायोलीन क्लासमधील सीलिंगचा (छत) तुकडा कोसळण्‍याची घटना शनिवारी घडली. अगोदरच ६० कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण झालेल्या या वास्‍तूच्‍या कामाच्‍या दर्जाबाबत प्रश्‍‍न उपस्थित झाले आहेत.

यापूर्वी विधानसभेत या विषयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. सध्‍या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्‍याने पुन्हा एकदा विरोधकांना विषय मिळाला आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम झाल्यापासून ते वादात अडकले आहे.

कामाचा दर्जा दुय्यम असल्याचा आरोप कलाकारांकडून होत आहे. अकादमीच्या मुख्य सभागृहातील उणिवा चव्हाट्यावर आल्यानंतर आणि राज्य-परराज्यातील कलाकारांनी त्यावर भाष्य केल्यावर अकादमीचे तत्कालीन चेअरमन तथा कला-संस्कृती मंत्री राहिलेले गोविंद गावडे यांच्या गळी ते उतरले नाही. त्यांनी या कलाकारांनी अकादमीच्या बदनामीची सुपारी घेतल्याचा आरोप करून नवा वाद ओढवून घेतला.

कला अकादमीच्या रक्षणासाठी स्थापन करण्‍यात आलेल्‍या ‘कला राखण मांड’ या कलाकारांच्या संघटनेने अकादमीच्या कामाविषयी आवाज उठविला. शिवाय सरकारने ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृती समितीने आपला अहवालही सरकारला सादर केला आहे.

त्यावर समितीने नूतनीकरण कामात २० त्रुटी शोधल्या. अहवाल पाहिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले, जे कला अकादमीचे अध्यक्ष देखील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT