Kala Academy Goa  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Goa: कला अकादमी अजूनही अपूर्णच; तीन वर्षांनंतर कार्यक्रमांना सुरुवात परंतु सुविधांची वानवा

Kala Academy Goa: कला अकादमी सोयीसुविधांनी परिपूर्ण कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Ganeshprasad Gogate

Kala Academy Goa: मागील 3 वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेली पणजीत कला अकादमी अद्यापही सुस्थितीत नसल्याचे एका घटनेनंतर समोर आले आहे.

कला अकादमी संकुल दुरुस्ती करून अजून सार्वजनिक बांधकाम खात्याने कला आणि संस्कृती खात्याकडे सुपूर्द केलेले नाहीय.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कला अकादमी पुढील पंधरवड्यात कला आणि संस्कृती खात्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

मात्र कला अकादमीमधून मिळालेल्या माहितीनुसार येथील बरेचसे काम अपूर्ण असून तळमजला वगळता पहिल्या मजल्या वरील काम शिल्लक आहे.

सध्या कला अकादमीत कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात झाली असून कला प्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

मात्र याठिकाणी अजून साधन सुविधांची वानवा जाणवत आहे. तब्बल तीन वर्षा नंतर पहिल्यांदाच कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात तियात्र सादर करण्यात आले.

मात्र सादरीकरणावेळी ध्वनी व्यवस्था खराब असल्याने त्यांना बाहेरून ध्वनी व्यवस्था मागवावी लागल्याने तियात्र सॅड्रीकरां करणाऱ्या संस्थेने नाराजी व्यक्त केलीय.

तसेच सभागृहाबाहेर कँटीन सुरु झाले नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होत आहे. जो पर्यंत कॅन्टीनचे कंत्राट दिले जात नाही तोपर्यंत आयोजकांनाच लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागणार असल्याचे कला अकादमीने म्हटले आहे.

मागील तीन वर्षांपासून कला अकादमी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सहाजिकच कलाकारांचे बरेच नुकसान झाले.

मात्र म्ही महिन्यांपासून येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होऊ लागल्याने कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. मात्र कला अकादमी सोयीसुविधांनी परिपूर्ण कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT