Kadamba Buses Dainik Gomantak
गोवा

Goa: कदंबच्या बसेस कर्नाटकातही सुरु...

त्यानंतर कर्नाटक आणि गोव्यादरम्यान (Goa) कोरोना नियंत्रणात आल्यानंतर कर्नाटकातील बसेस सुरु केल्या गेल्या.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना महामारीच्या (Covid 19) संकटानंतर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) कदंब (Kadamba) महामंडळाच्या आंतरराज्य बसेस (Interstate buses) बंद होत्या. त्यानंतर कर्नाटकात व गोव्यात (Goa) कोरोना नियंत्रणात आल्यानंतर कर्नाटकातील बसेस सुरु केल्या गेल्या. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने वरील दोन्ही राज्यातील विविध ठिकाणी ये जा करणाऱ्या कदंबच्या बसेस सुरु केल्या नव्हत्या. त्या आता हळूहळू सुरु होत आहेत.

कदंब महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार सध्या कर्नाटकातील 11 मार्गावर व महाराष्ट्रातील 10 मार्गावर कदंबच्या बसेस धावत आहेत. वास्को, मडगाव व पणजी येथील बसस्थानकातून हा बसेस विविध शहराकडे ये जा करतात. महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस पुणे, बोरीवली, कोल्हापूर- पंढारपूर- सोलापूर, वेंगुर्ला ,सावंतवाडी, घोटगेवाडी या मार्गावरील सर्व बसेस सुरु झाल्या आहेत. तर कर्नाटकातील बेळगाव, मुद्देहाळ लोकापूर, बदामी, गुलबर्गा, विजापूर, बंगळुरु, कारवार, या शहरात बसेस सुरु झाल्या. हैद्राबाद येथे जाणारी कदंबची बसही सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

SCROLL FOR NEXT