Kadamba bus service Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Service: प्रवासी विसरला पण बसवाहक जागला...वाचा विशेष वृत्त

वाहक नरेश मांद्रेकर यांनी जबाबदारीपूर्वक तो महागडा कॅमेरा त्या प्रवाशाच्या स्वाधीन केला

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus Service प्रवासी बसमध्ये अनेकवेळा काही वस्तू विसरतात. बसचे वाहक व चालक यांच्या नजरेस त्या वस्तू आल्या, तर ते त्या मूळ मालकापर्यंत पोहोचवतात, परंतु अज्ञात वस्तू जर एखाद्या प्रवाशाने उचलली तर ती मूळ मालकापर्यंत पोहोचणे अशक्य असते.

अशाच एका कदंब बसमध्ये बेळगाव येथे उतरलेल्या प्रवाशाचा महागडा कॅमेरा राहिला. परंतु या बसचे वाहक कारापूर - तिस्क येथील नरेश मांद्रेकर यांनी स्वतः जबाबदारीपूर्वक त्यांची बॅग शोधून काढत तो महागडा कॅमेरा त्या प्रवाशाच्या स्वाधीन केला.

8 जुलै रोजी सकाळी 11.30 वा. पणजीहून बेळगाव व बागलकोट येथे जाण्यासाठी प्रवासी कदंब बस (क्र. जीए 03 एक्स 0553) निघाली. बस बेळगाव येथे संध्याकाळी 4 वाजता पोहोचताच बसमधील काही प्रवासी उतरले, तर पुढील बागलकोट येथे जाणारे प्रवासी बसमध्ये चढले.

बसमध्ये 60 प्रवासी होते. बेळगाव येथे या बसमधून उतरलेल्या कोल्हापूर येथील राकेश बाळासाहेब कांबळे या प्रवाशाची सुमारे 70 हजार किंमतीच्या लेन्स कॅमेऱ्याची बॅग या बसमध्येच विसरून राहिली. हा प्रकार लक्षात येताच गोंधळून गेलेल्या कांबळे याला काय करावे ते कळेना.

भांबावलेल्या अवस्थेत असतानाच त्याला बेळगाव येथेच अन्य एक कदंब बस बेळगाव बसस्थानकावर दिसली. त्या बसच्या वाहकाशी त्याने या बागलकोटकडे गेलेल्या कदंब बससंबंधी चौकशी केली असता त्यांनी बसवाहक नरेश मांद्रेकर यांना फोन केला. त्यावेळी बस लोकापूर येथे पोहोचली होती.

चालत्या बसमध्येच नरेश मांद्रेकर यांनी बसमधील प्रवाशांना आपापली बॅग कोणती ते सांगण्यास सांगितले. सर्व प्रवाशांनी आपापल्या बॅगांची ओळख सांगितल्यानंतर एक बॅग शिल्लक राहिली.

त्यात तो कॅमेरा सापडला. दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासावेळी 9जुलै रोजी सकाळी 10.30 वा. नरेश मांद्रेकर यांनी ती कॅमेरा असलेली बॅग राकेश कांबळे यांच्या स्वाधीन केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT