Goa News | Anant Salkar Dainik Gomantak
गोवा

Goa News: ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकरांना 'गुज'तर्फे आदरांजली

Goa News: अनंत साळकर यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्रातील अनुभवी व हुशार पत्रकार हरपला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा पत्रकार संघाचे (गुज) सदस्य व ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकर (57) यांच्या निधनाबद्दल ‘गुज’ने शोक व्यक्त केला आहे. विविध विषयांवरील चौफेर लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. पत्रकारितेच्‍या क्षेत्रात त्यांनी विविध पदांवर काम करत आपला ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्रातील अनुभवी व हुशार पत्रकार हरपला आहे, असे ‘गुज’ने म्‍हटले आहे.

साळकर यांनी 1994 साली पत्रकारितेला सुरूवात केल्यापासून गेल्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत मराठी तसेच कोकणी वृत्तपत्रांमध्ये काम केले. ते एक चांगले लेखक, उत्कृष्ट कवी आणि अनुवादक होते. त्यांच्या कविता आणि एकांकिकांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

इंग्रजी कवितांचा मराठीत अनुवाद करण्यासाठी ते ओळखले जात असत. साळकर यांचे कोकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. ‘गुज’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रकारिता पुरस्कार 2018 , 2019 व 2020 साठी तीन सदस्यीय परीक्षकांमध्‍ये ते होते.

2020 मध्ये गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे राष्ट्रीय पत्रकारदिनानिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल साळकर यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव गोमेकॉला दान करण्यात आले. गोवा पत्रकार संघातर्फे त्यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

अनुवादात हातखंडा

अनेक साहित्‍यिक आणि पत्रकार ज्या गोष्टीपासून दोन हात दूरच राहू पाहतात, त्या अनुवादाच्या प्रांतात अनंत साळकर यांनी मात्र बरीच मुशाफिरी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कित्येक लेखकांच्या साहित्याचा ते एवढ्या लीलया मराठीत अनुवाद करायचे की वाचणाऱ्यांना तो मूळ लेख मराठीतच लिहिला आहे असे वाटायचे. साळकर कवितांचाही अनुवाद करायचे. महिला पत्रकार एथेल डिकॉस्‍टा यांच्या इंग्रजी काव्‍यसंग्रहाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT