Goa Govt Fourth Janata Darbar | Nilkanth Halarnkar | Subhash Phaldesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Janata Darbar: गोव्यात 'या' दिवशी भरणार चौथा जनता दरबार; सत्तरी, काणकोण तालुक्यात आयोजन

मंत्री सुभाष फळदेसाई, नीळकंठ हळर्णकर राहणार उपस्थित

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Govt Fourth Janata Darbar: गोवा राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या जनता दरबाराचे पुन्हा आयोजन करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील 9 तारखेला हा जनता दरबार होणार आहे. राज्य सरकारचा हा चौथा जनता दरबार आहे. सत्तरी आणि काणकोण येथे या दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.

उत्तर गोव्यातील सत्तरी येथे होणाऱ्या जनता दरबारात समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई हे उपस्थित राहणार आहेत तर दक्षिण गोव्यातील काणकोणमधील जनता दरबारात मत्सव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित राहणार आहेत.

जनता दरबारात नागरिक थेट मंत्र्यांना स्वतःची समस्या सांगू शकतात. त्यामुळे मंत्र्यांच्या साह्यासाठी प्रत्येक सरकारी विभागाचे प्रमुख किंवा संबंधित विभागांचे प्रतिनिधी यावेळी दरबारात उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी जनता दरबाराचे स्थळ निश्चित्त करतील.

सर्व विभागांच्या प्रमुखांनी त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना याबाबत सतर्क करावे, तसेच जनतेच्या प्रश्न, समस्यांची तत्काळ दखल घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे लोकांच्या समस्या ऑन दी स्पॉट सोडविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यातून अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्या आहेत. किंवा त्यांचा पाठपुरावा केला गेला आहे.

दरम्यान, गतवेळी साखळीत झालेल्या जनता दरबारला मात्र कमी प्रतिसाद लाभला होता. त्या जनता दरबारात जनतेपेक्षा अधिकाऱ्यांची संख्या अधिक होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT