Janani Janmabhoomi koul Dainik Gomantak
गोवा

गोवा सुरक्षित,उच्चशिक्षित आणि निर्व्यसनी हवा

मोफत शिक्षण देणाऱ्या घोषणा खूप होतील परंतु त्या मुलांनाच नव्हे तर समाजालाही मिळाव्यात, असे शैक्षणिक धोरण गोव्यातही हवे.

सुहासिनी प्रभुगावकर

जिच्या हाती पाळण्याची दोरी असते तिच्या हाती ‘समाजाचीही दोरी’ असते. आपल्या मुलांवर प्रेमाची पाखर घालताना त्यांच्यावर चांगले संस्कार करताना, त्यांना बऱ्या वाईटाची जाणीव करून देताना तिच्याकडून चुका घडणारच नाहीत असे नव्हे. कारण अखेर तीही माणूस आहे. मुलांबरोबर समाजही उच्चशिक्षित व्हावा म्हणजेच समाजाला प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे दरवाजे खुले व्हावेत, शिक्षणात सुलभता असावी, शिक्षणासाठी मुलांना, समाजाला संघर्ष करावा लागू नये, असा गोवा भविष्यात हवा.

शिक्षणानंतर नोकरी तीही चांगल्या वेतनाची मिळावी, अशा अपेक्षा असल्या तरीही मुलांना ‘मूठ मारेल तेथे पाणी काढू शकशील’ असेही समुपदेशन शिक्षणातून मिळायला हवे. मोफत शिक्षण देणाऱ्या घोषणा खूप होतील परंतु त्या मुलांनाच नव्हे तर समाजालाही मिळाव्यात, असे शैक्षणिक धोरण गोव्यातही हवे. शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली असल्यामुळे चांगल्या शिक्षणातून मुले प्रगती करू शकतील. मुलांच्या कौशल्याला वाव देणाऱ्या शिक्षणाबरोबरच शिक्षण देतेवेळी धर्म, जात, मुलगा, मुलगी असे भेद राज्यात असू नयेत. चांगल्या क्रीडा सुविधा मुलांना मिळायला हव्यात. क्रीडा गुणांना उत्तेजनही देणारे धोरण असावे. शारीरिक शिक्षणात व्यायामाबरोबरीने स्वरक्षणाचे, आत्मनिर्भरतेचे धडे देण्याची तरतूद शिक्षणात असावी.

सुरक्षित गोवा समाजाच्या भवितव्यासाठी फार गरजेचा आहे. कायदा व सेवा यंत्रणेचे अस्तित्व दिसायला हवे. समाजाला या यंत्रणेकडून निरंतर सेवा मिळायला हवी. निष्पक्षपातीपणे कायदा, सेवा यंत्रणा कार्यरत असावी. प्रामुख्याने मुलींसाठी, महिलांसाठी सदाकाळ या यंत्रणेचा उपयोग व्हावा, त्यांच्यावर अन्याय झाल्यास न्यायासाठी उंबरठे झिजवावे लागू नयेत. न्याय जलदगतीने मिळावा. कायदा, यंत्रणेत समानता असावी. मुलांचे शोषण होऊ नये, अन्याय अत्याचार होऊ नयेत यासाठी यंत्रणा कार्यरत असायला हव्या. मद्य, जुगार, अमली पदार्थ, मटका, कसिनो, गुटखा, तंबाखू, सिगारेटच्या व्यसनांकडे मुलांनी वळू नये याचे धडे समाज शिक्षणातून मिळायला हवे. व्यसनांवर निर्बंघ घालण्यासाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. या व्यसनांना उत्तेजन मिळू नये, मुले त्या व्यसनामागे भरकटली जाऊ नयेत याची जाणीव पालकांबरोबरच सरकारनेही विविध माध्यमातून करून देणारा गोवा हवा.

महिला व बाल विकासाला प्राधान्य देणारा, जेंडर बजेटिंग करणारा गोवा का असू नये? विकास म्हणजे फक्त योजना नव्हेत तर सर्वांगिण विकासाला चालना देणारा गोवा हवा. प्रदूषणमुक्त, पर्यावरणाभिमुख, निसर्गसंपन्न गोवा म्हणजेच मानवी विकासाचा पहिला टप्पा असतो. निसर्गाविना गोव्याचा विचारच होऊ शकत नाही. निसर्गावरच गोव्याची आत्मनिर्भरता निर्भर असून काँक्रीटीकरणातून समस्या सुटणार नाहीत तर त्या गंभीर होणार आहेत, या समस्यांवर उपाययोजना हवी, पर्यायही हवेत. विविध कलांचे उच्चशिक्षण राज्यात मिळावे, त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून व्यासपीठे तयार व्हायला हवीत. खासगीकरणचाही त्यात सहभाग असावा. सामाजिक सलोखा जपणारा व ते बीज गोव्यातून इतरत्र पसरवणारा गोवा हवा. धर्मांधता, हिंसा, दंगलींना, सामाजिक तंट्यांना थारा न देणारा वैशिष्ट्यपूर्ण गोवा कसा असू शकतो याची मांडणी हवी. कृषी असो अनेक क्षेत्रे असोत त्यातून रोजगाराचा मार्ग दाखवणारा, स्वयं रोजगाराला चालना देत त्यातून इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे यातच गोव्याचे हित आहे. निसर्ग पर्यटन, फळबागा, समुद्रकिनाऱ्यांच्या रक्षणातून फुलणाऱ्या प्रसन्न गोव्याच्या अपेक्षा मातांनी का करू नयेत?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

SCROLL FOR NEXT