Goa ferry Services  Dainik Gomantak
गोवा

Goa Boat Services: गोव्यात लवकरच अत्याधुनिक फेरी सेवा! 21 मार्चला नवीन 'रो-रो' नौकांचे लोकार्पण

Goa Ferry News: अत्याधुनिक तंत्राचा वापर करून प्रोपल्शनच्या साहाय्याने रो-रो नौका तयार करणारं गोवा हे पाहिलंच राज्य ठरणार आहे

Akshata Chhatre

रायबंदर: अत्याधुनिक तंत्राचा वापर करून प्रोपल्शनच्या साहाय्याने रो-रो नौका तयार करणारं गोवा हे पाहिलंच राज्य ठरणार आहे. या नौकांचे लोकार्पण २१ मार्चला होईल. ऑस्ट्रियामधून प्रोपल्शन प्रणाली यायला उशीर झाल्यामुळे उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. तरीही नदी परिवहन विभाग (RND) या नवीन तंत्रज्ञानामुळे राज्यातील नौका वाहतुकीत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करत आहे.

आरएनडीचे संचालक विक्रम राजेभोसले यांनी सांगितले की, "नौकांची बांधणी पूर्ण झाली असून अद्याप प्रोपल्शन प्रणाली गोव्यात पोहोचलेली नाही. प्रोपल्शन तंत्रज्ञान गोव्याच्या नदी परिवहन प्रणालीत पहिल्यांदाच वापरले जात आहे.

या प्रोपल्शन तंत्रज्ञानामुळे नौका चालवण्याची कार्यक्षमता वाढेल." बाकी नौकांमध्ये जहाजाच्या खाली शाफ्ट आणि प्रोपेलर वापरले जातात,मात्र या नवीन नौकांमध्ये डेकवर प्रोपल्शन प्रणाली वापरली जाणार आहे. यामुळे दोरखंड प्रोपेलरमध्ये अडकण्याचा धोका कमी होतो. तसेच, काही बिघाड झाल्यास ही प्रणाली हायड्रॉलिक पद्धतीने डेकच्या खाली सरळ करता येते, ज्यामुळे ड्राय डॉकची गरज भासत नाही आणि वेळ वाचतो.

आरएनडीचे संचालक विक्रम राजेभोसले म्हणाल की पावसाळ्याच्या दिवसांत दर १५ दिवसांनी नौका दुरुस्तीसाठी आरएनडीच्या कार्यशाळेत घेऊन जाव्या लागतात मात्र आता या नवीन प्रणालीमुळे वेळ वाचणार आहे. या नवीन नौका रायबंदर-चोराव मार्गावर फिरतील. स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत सध्या रायबंदर फेरीचे काम अंतिम टप्प्यात आहे, जे १५ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि यानंतर नवीन नौकांचे लोकार्पण केले जाईल. या नवीन नौकांमुळे राज्यातील प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT