Vijay Sardesai | Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai : 'अर्थसंकल्पाने गोव्याला लोटले आर्थिक संकटात'

अर्थसंकल्पाने गोव्याला आर्थिक संकटात लोटले आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Union Budget 2023: या अर्थसंकल्पाने गोव्यासाठी फारसे काहीच दिलेले नाही. उलट गोव्याला आर्थिक संकटात लोटले आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

‘डबल इंजिन सरकारने या अर्थसंकल्पात गोव्याची निराशा केली आहे. सरकार गोवावासीयांना दिलासा देण्यात अपयशी ठरले,’ अशी टीका सरदेसाई यांनी सरकारवर केली. अर्थसंकल्पात मिष्टी योजनेची घोषणा करण्यात आली.

समुद्राला लागून असलेल्या किनारी भागातील खारफुटीचे जतन करण्यासाठी मिष्टी योजना आणली जात आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण होणार आहे.

‘मिष्टी’ या शब्दाचा अर्थ बंगाली भाषेत गोड आहे. मिष्टी योजनेसाठी कॅम्पा फंडचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, गोव्याचा पैसा मध्य प्रदेशमध्ये वनीकरणासाठी वळविण्यात आला आहे. त्यामुळे बजेटमध्ये गोव्याला काहीच मिळाले नाही, असे ते म्हणाले.

म्हादईप्रश्नी गोव्यातील सरकारचे केंद्राला काहीच पडले नाही, असे दिसून आले आहे. त्यामुळे प्रमोद सावंत यांच्या मागण्या केंद्र सरकार किती पूर्ण करेल याबद्दल शंकाच आहे, असे सरदेसाई म्हणाले.

प्रश्‍नांचा भडिमार...

कोळसा वाहतुकीसाठी गोव्याच्या जंगलातील झाडे कापण्याचा घाट का घातला जातोय? डबल ट्रॅकिंगसाठी समुद्री मार्गाचा वापर करावा. 50 जागा टुरिझम डेस्टिनेशन म्हणून निश्चित करून त्यांचे प्रमोशन केले जाणार आहे. या 50 साईट्समध्ये गोव्यातील 10 तरी साईट्स प्रमोद सावंत निश्चित करू शकतात का? की म्हादई सारखे हेही हातातून जाऊ देणार आहेत का? असा सवाल सरदेसाई यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT