New Year Celebration on Goa Beach Dainik Gomantak
गोवा

New Year Celebration: नववर्ष स्वागताच्या बहुतांश पार्ट्यांना हिंदी साज

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

गोव्‍यातील ‘थर्टिफस्‍ट’ची पार्टी म्‍हणजे इंग्रजी व कोंकणी गाण्‍यांची प्रेक्षकांना दिलेली मेजवानी, असे चित्र दिसायचे. मात्र, यंदा दक्षिण गोव्‍यात कित्‍येक हॉटेल्‍समध्‍ये इंग्रजी व कोंकणी गाण्‍यांना फाटा देत संपूर्ण ऑर्केस्‍ट्रा हिंदी गाण्‍यांचाच झालेला पहायला मिळाला.

याचे कारण म्‍हणजे, गोव्‍यात मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले दिल्‍ली आणि हरियाणा या हिंदी पट्‍ट्यांतील पर्यटक. विदेशी पर्यटक या मोसमात कमी आल्‍याने देशी पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी यावेळी फोर व फाईव्‍ह स्‍टार हॉटेल्‍सनी आपल्‍या खोल्‍यांचे दर निम्‍म्‍यावर आणले होते.

एरव्‍ही वर्षअखेरीला या हॉटेल्‍समधील सूटचे दर ३० ते ४० हजार रुपये इतके असतात. मात्र, यावेळी २० ते २५ हजार रुपये एवढा दर कमी करण्‍यात आला होता. त्‍यामुळेच या दोन्‍ही प्रकारच्‍या तारांकित हॉटेल्‍समध्‍ये पर्यटकांची सरासरी ९० टक्‍के उपस्‍थिती होती.

अखिल गोवा लहान व मध्‍यम हॉटेल्‍स मालक संघटनेचे माजी अध्‍यक्ष सेराफीन कॉता यांना विचारले असता, चार आणि पंच तारांकित हॉटेल्‍समध्‍ये पर्यटकांचा ओघ समाधानकारक होता. असे जरी असले तरी त्‍या खालच्‍या टू आणि थ्री स्‍टार हॉटेल्‍समध्‍ये गर्दी कमी होती. याचे कारण म्‍हणजे, कमी झालेले विदेशी पर्यटक.

गोव्‍यात येणारे विदेशी पर्यटक टू आणि थ्री स्‍टार्स हॉटेलमध्‍येच राहाणे पसंत करतात. मात्र, ज्‍या हॉटेल्‍सचे दर अगदीच कमी होते, तिथेही पर्यटकांची गर्दी दिसली असे त्‍यांनी सांगितले. उत्तर गोव्‍यात ताज विवांता, जिंजर या हॉटेल्‍समध्‍ये पर्यटकांची गर्दी होती; तर दक्षिण गोव्‍यात लिलाज हॉटेलमध्‍ये बऱ्यापैकी पर्यटक दिसून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

SCROLL FOR NEXT