IFFI Goa 2024 Opening Ceremony Dainik Gomantak
गोवा

IFFI Opening Ceremony: लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन!! 55व्या इफ्फीसाठी गोवा सज्ज

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाचे यजमानपद गोव्याजवळ असल्याने गोव्यातील 14 कलाकृती दरम्यान सादर केल्या जाणार आहेत

Akshata Chhatre

पणजी: गेल्या अनेक दिवसापासून अनेकांना आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ओढ लागून होती आणि आता बुधवारी (20 नोव्हेंबर) रोजी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर इफ्फीचे उद्घाटन होणार आहे. गोवा 2004 पासून इफ्फीच्या यजमान पदावर आहे आणि यंदाच्या वर्षी या सोहळयाला आणखीन रंजक आणि आकर्षक बनवण्यासाठी गोवा सरकार तसेच समितीने प्रयत्न केले आहेत.

ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी यांनी दिग्दर्शित केलेल्या द बेटर मॅनसह 180 आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह 101 देशांतील तब्बल 270 चित्रपट महोत्सवाच्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत. यंदा ऑस्ट्रेलिया या देशाची निवड कंट्री ऑफ फोकस म्हणून करण्यात आली आहे, तसेच ऑस्ट्रेलियाचे अनुभवी दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना त्यांच्या जीवनभराच्या चित्रपटांच्या प्रवासासाठी सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

गोव्यात होणाऱ्या हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा कार्यक्रम गोवा एंटरटेनमेंट सोसायटी, नेशनल फिल्म डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय एकत्र येऊन आयोजित करतात. यावर्षी इफ्फीच्या माध्यमातून तरुणांना चित्रपट निर्मीतीचे अधिकाधिक ज्ञान मिळावे म्हणून विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

चित्रपट महोत्सवाचे यजमानपद गोव्याजवळ असल्याने गोव्यातील 14 कलाकृती दरम्यान सादर केल्या जाणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात यंदा रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटाने एकूण सोहळ्याची सुरुवात होईल. बाकी, घर जैसा कुछ यासह इतर 45 भारतीय चित्रपट इफ्फीमध्ये दाखवले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT