IRB constable arrested in Goa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: विवाहित महिलेचा पाठलाग आणि पतीला धमकी, IRB कॉन्स्टेबलला म्हापसा पोलिसांकडून अटक

संशयित कॉन्स्टेबल सक्सेना याने महिला आणि तिच्या पतीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

Pramod Yadav

IRB constable arrested in Goa: विवाहित महिलेचा पाठलाग करुन तिच्या पतीला धमकी दिल्या प्रकरणी भारतीय राखीव बटालियन (IRB) कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. म्हापसा पोलिसांनी आज (दि.07) ही कारवाई केली. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

उत्तर गोवा, बार्देश तालुक्यातील महिलेने याप्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आयआरबी कॉन्स्टेबल सूरज शैलेंद्र सक्सेना आणि त्याचा मित्र बबीत नाईक यांनी महिलेसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसेच, पाठलाग केला. वारंवार अशाप्रकारे पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

संशयित कॉन्स्टेबल सक्सेना याने महिला आणि तिच्या पतीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिवाय, त्याने त्यांना धमकावले आणि भीतीचे वातावरण निर्माण केले. असा आरोप करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी, भारतीय दंड संहितेच्या कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), कलम 354-डी (पाठलाग), कलम 509 (शब्द, हावभाव किंवा कृती स्त्रीच्या नम्रतेचा अपमान करण्याचा हेतू), आणि कलम 506 (ii) (धमकी) अनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी संशयित आयआरबी कॉन्स्टेबल सूरज शैलेंद्र सक्सेना याला अटक करण्यात आली असून, त्याचा मित्र बबीत नाईक याचा शोध सुरू आहे.

पोलीस विभागाने देखील या घटनेत सहभागी कॉन्स्टेबलची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून संभाव्य विभागीय कारवाई निश्चित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT