IPL betting racket busted  Dainik Gomantak
गोवा

Goa IPL Betting Racket: आयपीएल सामन्यांवर बेटिंग; पैशांचा खेळ; 13 जणांना अटक

पर्वरी, वेर्णा पोलिसांची कारवाई : मोबाईल, लॅपटॉपसह अन्य साहित्य जप्त

दैनिक गोमन्तक डिजिटल

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स वि.सनरायझर्स हैदराबाद सामन्यावर सट्टा घेतल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी आरोसीत दहा आणि पर्वरी पोलिसांनी पर्वरीत येथे टाकलेल्या छाप्यात 3 जण अशा एकूण 13 जणांना अटक केली.

यात आरोसी येथे 31 मोबाईल फोन, 7 लॅपटॉप, 3 इंटरनेट राऊटर आणि इतर इलेक्टॉनिक उपकरणे वेर्णा पोलिसांनी जप्त केली, तर पिळर्ण येथे पर्वरी पोलिसांनी मोबाईल,लॅपटॉपसह सट्ट्यासाठी वापरले जाणारे साहित्य मिळून २ लाखांचा ऐवज जप्त केला.

पर्वरी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गस्त घालत असताना काही लोक आयपीएल स्पर्धेवर गोवन पॅराडाईज कॉलनी, लेन १०, मार्रा पिळर्ण येथे काहीजण सट्टा घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पुढे वॉरंट काढून या परिसरात तातडीने छापा टाकण्यात आला. तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स वि.सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यावर सट्टा घेणाऱ्या विपुल बारोट (३३),संजय कुमार मकवाना, (२९ दोघेही रा.अहमदाबाद), इम्तियाजभाई चौहान (४३,रा. राजकोट, गुजरात) या तिघांना अटक केली.

आरोसीतील कारवाईत दहाजण अटकेत !

अटक केलेल्यांत नितिन सिंग (३१, छत्तीसगड), सचिन सिंग (२४, उत्तर प्रदेश), सौरभ देशपांडे (२६, पुणे), सनी जैस्वाल (३१, दिल्ली) सत्तरेंद्र कुमार सिंग (२७, अलाहाबाद), सुनिल कुमार (२७, ओडिशा), मितेश प्रधान (२३, छत्तीसगड), नंदकिशोर साहू (३२,छत्तीसगड) दलीप सिंग (२४, राजस्थान) व किशन सिंग (२१, राजस्थान) आदींचा समावेश आहे. वेर्णा पोलिसांनी ही कारवाई केली.

३१ मोबाईल, ७ लॅपटॉप हाती

मुरगाव पोलिस उपअधिक्षक सलिम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार वेर्णा पोलिसांना गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोसी येथील एका घरावर छापा टाकला. यावेळी आयपीपल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दहा संशयितांना अटक केली.

संशयितांकडून ३१ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, ३ इंटरनेट राऊटर आणि इतर इलेक्टॉनिक उपकरणे जप्त केली. वेर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रेसियस, उपनिरीक्षक संकेत तळकर पोलिस उपअधीक्षक सलिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT