Drugs Arrest Canva
गोवा

Goa Drugs Case: ‘मम्मी डॅडी’, ‘म्यॅव म्यॅव’ ड्रग्ससोबत जीवघेण्या रासायनिक पदार्थांचा गोव्याला विळखा, नायजेरियन पेडलर्सचा सुळसुळाट

Goa Crime: युनूस माताजी हा पोंगीरव्हाळ-कुडचडे येथील रहिवासी असून यापूर्वी गांजा आणि हॅश ऑईल व्यवहार प्रकरणात दोनवेळा त्याला पकडले होते.

Sameer Panditrao

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: ‘मम्मी डॅडी, म्याँव म्याँव...’ एरवी साधे किंवा मुलांच्या खेळातील हे शब्द वाटावेत. पण प्रत्यक्षात हे शब्द साधेसुधे नाहीत. हे शब्द ड्रग्स व्यवसायातील परवलीचे शब्द असून गोव्यात उपलब्ध असलेल्या रासायनिक ड्रग्सची ती नावे असून मोठ्या प्रमाणात गोव्यातील युवा पिढी त्यांच्या आहारी जाऊ लागली आहे.

मागील आठवड्यात मायणा-कुडतरी पोलिसांनी युनूस माताजी या ड्रग पेडलरला अटक केली होती. त्याच्याकडे ‘क्रिस्टल मॅथ’ या जीवघेण्या रासायनिक अमली पदार्थासह हायड्रो गांजा आणि एक्स्टसी गोळ्या सापडल्या होत्या. कोकेन हा अमली पदार्थ महाग असल्याने त्याला पर्याय म्हणून त्याच्याहून सातपटीने स्वस्त असलेला ‘क्रिस्टल मॅथ’ हे केमिकल ड्रग सध्या बाजारात आले असून त्याचाच पुरवठा करण्यासाठी युनूस आला असता चांदर येथे त्याला अटक करण्यात आली.

युनूस माताजी हा पोंगीरव्हाळ-कुडचडे येथील रहिवासी असून यापूर्वी गांजा आणि हॅश ऑईल व्यवहार प्रकरणात दोनवेळा त्याला पकडले होते. मंगळवारी रात्री त्याला सैलाभाट-चांदर येथे त्याचा सहकारी परसप्पा उर्फ परशा तलवार (विजापूर कर्नाटक) याच्यासह रंगेहात पकडले होते.

ड्रग्स पेडलर युनूस माताजी हा त्याचा सहकारी परशा तलवार याच्यासमवेत कुडचडे अमली पदार्थ विकण्यासाठी येत होता. कुडचडेतील काही उद्योगपतींच्या मुलांनी हा अमली पदार्थ त्याच्याकडून विकत घेतला होता. त्याची डिलिव्हरी करण्यासाठी युनूस आला असता, पोलिसांच्या तावडीत सापडला.

त्यांच्याकडून पोलिसांनी तीस हजार रुपये किमतीचा तीन ग्रॅम हायड्रो गांजा, तीस हजार रुपये किमतीच्या तीन ग्रॅम एक्स्टसी गोळ्या, २५ हजार रुपये किमतीच्या अडीच ग्रॅम एमफेटेमाईन, मिळून ८५ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केला होता. शिवाय त्यांनी वापरलेली युनूस माताजीच्या मालकीची मारुती स्विफ्ट कारही पोलिसांनी हस्तगत केली होती.

यासंबंधी मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अरुण देसाई यांना विचारले असता, युनूसने हे ड्रग्स कुणाकडून आणले याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असून त्याच्याकडून आम्हाला मुख्य डिलरचा फोन मिळाला आहे. मात्र, युनूसला अटक झाल्यानंतर हा फोन पूर्णत: बंद आहे. त्यामुळे त्याचे लोकेशन मिळणे कठीण झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रासायनिक ड्रग्सचा सध्या उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणात वापर होत असून या भागात राहणाऱ्या नायजेरियन ड्रग पेडलर्सकडून हा व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, आता हे रासायनिक ड्रग्स दक्षिण गोव्यातही पोहोचल्याचे उघड झाले असून दक्षिण गोव्यातील पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

समोसे विकणारा युनूस बनला ड्रग पेडलर

युनूस हा कुडचडे भागात राहात असून सुरुवातीला तो वडिलांसोबत कुडचडेत हॉटेल्सना समोसे आणि पॅटीस पुरवण्याचे काम करत होता. हा व्यवसाय करताना त्याची ड्रग्स माफियांशी ओळख झाली. सध्या उत्तर गोव्यातील काही मोठ्या ड्रग माफियांशी त्याचे संबंध असून उत्तर गोव्यातील खासगी स्वरूपाच्या पार्ट्यांना तो कोकेन, एमडी, एलएसडी, एक्स्ट्रेसी अशा स्वरूपाच्या महागड्या आणि रासायनिक अमली पदार्थांचा पुरवठा तो करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

बंदी असलेल्या क्रिस्टल मॅथला मागणी

एरवी ड्रग्सच्या डिक्शनरीत ज्याला ‘एमडीएमए’ या नावाने ओळखले जाते, त्याला गर्दुल्ल्यांच्या दुनियेत ‘मम्मी डॅडी’ म्हणून ओळखले जाते. ‘म्याँव म्याँव’ हाही मांजराचा आवाज नसून कोकेनच्या कुटुंबातील तो ड्रग्स आहे. आता त्यात ‘क्रिस्टल मॅथ’ या नव्या ड्रग्सची भर पडली असून दक्षिण गोव्यातही त्याचा शिरकाव झाला आहे. विशेष म्हणजे, ‘क्रिस्टल मॅथ’ या पदार्थावर जगभरात बंदी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: ..समुद्र राजा आता शांत हो! मच्छीमार महिलांकडून काणकोणात समुद्रपूजन; समुद्रात सोडला नारळ

Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

Goa Live News: कूटबण जेट्टीवर आढळले कॉलराचे सहा रुग्ण

Goa Cricket: गोवा संघात येणार 'नवा पाहुणा'! फलंदाजी होणार भक्कम; थेट कर्णधारपदी होणार निवड?

SCROLL FOR NEXT