Purple Fest Dainik Gomantak
गोवा

Purple Fest: 8 ते 13 जानेवारीला गोव्यात 'आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट'

Purple Fest : राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि समाज कल्याण खात्यातर्फे आयोजित

Ganeshprasad Gogate

Purple Fest : राज्यात मागील वर्षी आयोजित करण्यात आलेला पर्पल फेस्टला देशभरातून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदाही हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 8 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत गोव्यात हा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट संपन्न होणार असल्याची माहिती समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिलीय.

राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि समाज कल्याण खात्यातर्फे आयोजित केला जाणारा हा महोत्सव आता ‘आंतरराष्ट्रीय पर्पल पेस्ट गोवा 2024’ म्हणून जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या आधी केली होती.

या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टसाठी आतापर्यंत 2 हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली असून 6 हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी नाव नोंदणी करतील अशी अपेक्षा असल्याचेही फळदेसाई यांनी सांगितले. या फेस्टसाठी 15 कोटींचे बजेट असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मागील वर्षीच्या पर्पल फेस्ट सोहळ्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमामध्ये केले होते.

लाइव्ह परफॉर्मन्स, भव्य प्रदर्शन, क्रीडा इव्हेंट्स, विविध कार्यशाळा, सांस्कृतिक उपक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमा असे बरेच उपक्रम मागील वर्षीच्या फेस्टमध्ये पाहायला मिळाले होते.

यंदा कुठले कार्यक्रम आयोजित करणार याबाबत अद्याप माहिती प्राप्त होऊ शकली आंही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT