Goa Institute of management Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील शैक्षणिक संस्थांचे राष्ट्रीय यश

एनआयआरएफ जाहीर : देशातील ‘टॉप 100’ मधून मात्र गोवा विद्यापीठ बाहेर

दैनिक गोमन्तक

पणजी : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) जाहीर झाले असून, या रॅंकिंगमध्ये व्यवस्थापन विभागात साखळी येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे 36 व्या स्थानावर आहे. औषधनिर्माण विभागात पणजी येथील गोवा कॉलेज ऑफ फार्मसी हे 55 व्या क्रमांकावर आहे. ही गोव्यासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

दुसरीकडे गोवा विद्यापीठाचा देशातील 100 टॉप विद्यापीठात समावेश होऊ शकला नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ‘एनआयआरएफ रॅंकिंग’ शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थांच्या ‘टॉप शंभर’च्या यादीत राज्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. एनआयआरएफमध्ये सलग चौथ्यांदा ‘आयआयटी मद्रास’ने बाजी मारली असून ती सर्वोत्तम संस्था ठरली.

तीन संस्थांनी मारली बाजी

व्यवस्थापन विभागात साखळी येथील गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट हे 36 व्या स्थानी. (गुण 53.58)

औषधनिर्माण विभागात पणजी येथील गोवा कॉलेज ऑफ फार्मसी हे 55 व्या स्थानी. (गुण 44.72)

तर अभियांत्रिकीमध्ये फोंड्यातील नॅशनल इन्सिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा हे 88 व्या क्रमांकावर. (गुण 40.48)

या आधारे ठरविले जाते मानांकन

ही क्रमवारी ठरविताना देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, दंत वैद्यकीय, विधी, आर्किटेक्चर असे एकूण 11 गट निश्चित केले आहेत. हा दर्जा ठरविण्यासाठी संशोधन, सर्वसमावेशकता, पदवीधर विद्यार्थ्यांचे निकाल, संख्या आणि शिकविणे, शिकणे आणि संसाधने असे काही निकष ठरविले आहेत. त्याआधारे ही क्रमवारी जाहीर करण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT