Goa Taxi Need Meters Dainik Gomantak
गोवा

Goa: टॅक्सीला मीटर बसवा, नाहीतर योजनेला मुकाल -न्यायालय

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा(Goa) मोटर अधिनियम 2016 आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, राज्‍यातील पर्यटक टॅक्सीधारकांना(Goa Taxi) डिजिटल मीटर बसवावे लागणार आहेत. यासाठी सरकारने नेमलेल्या ‘रोजमार्टा ऑटोटेक’ कंपनीने मीटर बसवण्याला प्रारंभ केला असून चार ठिकाणी केंद्रे उभारली आहेत. वाहतूक खात्याने जाहीर केलेल्या वेळेतच मीटर बसवून घेतले तरच सरकारने(Goa Government) मीटर किंमत परत देण्याबाबत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर योजनेचा फायदा मिळणार नाहीच, शिवाय टॅक्सी परवानाही रद्द करण्यात येणार आहे. दरम्‍यान, जास्तीत जास्त टॅक्सीचालकांनी मीटर बसवून घ्यावेत म्हणून ‘गोवा माईल्स’ने ‘मीटर उत्सव’ करण्याची तयारी सुरू केली आहे.

डिजिटल मीटर बसवण्यासाठी काढलेली निविदा रोजमार्टा ऑटोटेक लिमिटेडने स्वीकारली असून त्यांनी पणजी (मेरशी), वास्को, मडगाव आणि डिचोली येथे चार ठिकाणी केंद्रे उघडली आहेत. तसेच मीटर बसविण्याच्या कामाला सुरवात केली आहे. यासाठी जीएसटी सह ११ हजार 234 रुपये आकारले जात आहेत. त्यांपैकी 8 हजार 579 ही मीटरची किंमत असून डेटा चार्ज आणि इतर खर्च 2655 रुपये आहे. मीटरची किंमत सरकारने दोन हप्त्यांमध्ये टॅक्सीचालकांना परत देण्याची योजना जाहीर केलेली आहे, अशी माहिती रोजमार्टा ऑटोटेकचे संचालक सावन कुमार यांनी दिली.

गोवा माईल्सच्या टॅक्सीत मीटर असतोच, पण सरकारच्या नियमानुसार डिजिटल मीटर बसवून घ्यावे लागणार आहेत. सध्या व्यवसाय बंद असल्याने टॅक्सीचालक आर्थिक अडचणीत आहेत. त्‍यामुळे त्‍यांना आर्थिक मदत देण्‍याची योजना संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे. टॅक्सीचालक अव्‍वाच्‍या सव्‍वा भाडे आकारत असल्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या आहेत. त्‍यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने भाडे मीटर, आधुनिक डिजिटल भाडे मीटर आणि मालवाहतूक गाड्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मीटर बसवण्याचे आदेश पुन्हा दिल्याने डिजिटल मीटर 30 बसविणे अनिवार्य आहे.असे प्रतिपादन वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक फ्रान्सिस्को वाझ यांनी केले आहे

मीटर बसवण्‍यासाठीची केंद्रे -

पणजी (मेरशी), वास्को, मडगाव आणि डिचोली या चार ठिकाणी केंद्रे उघडली आहेत.

मीटरसाठीचे 11 हजार 234 रुपये भरून बुकिंग केल्यावर ते मीटर लीगल मेट्रोलॉजी खात्याकडून सील करून स्टॅम्पिंग केले जातात, जे इतरांना उघडता येत नाहीत. नंतर नॅशनल इन्फोमॅट्रिक्स सेंटरकडून ते कार्यान्वित केले जातात. राज्यात ऑल गोवा परवाना, ऑल इंडिया परवाना आणि काळ्‍या-पिवळ्‍या अशा तीन प्रकारच्या 17 हजार 842 टॅक्सी असून त्‍यांपैकी ऑल इंडिया परवानाधारक 14575आहेत.

ऑल गोवा परवानाधारक 2593 आहेत. 674 काळ्या-पिवळ्या टॅक्सी गोव्यात आहेत. यापैकी 2400 टॅक्सी गोवा माईल्सकडे नोंद आहेत. मीटर बसवण्यासाठी गोवा माईल्सने पुढाकार घेतला आहे.

दरम्यान डिजिटल मीटर अमूक एका कंपनीकडून घेण्याच्या सक्तीला टॅक्सीचालकांनी तीव्र विरोध करणे सुरू केले आहे. वाहतूक संचालक संजय सातार्डेकर यांची भेट घेण्याचा टॅक्सीचालकांनी प्रयत्न केला मात्र त्यांनी भेट न घेताच कार्यालयातून निघून जाण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे टॅक्सीचालक संतप्त झाले. सोमवारी सकाळी 11वाजता मोठ्या संख्येने जुन्ता हाऊसजवळ जमून वाहतूक संचालकांच्या पक्षपाती वृत्तीचा जाब विचारण्याचे त्यांनी ठरवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT