गोवा

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

Donation: या संस्‍थांमध्‍ये काेंकणी भाषा मंडळाचा समावेश असून या संस्‍थेने उत्‍कृष्‍ट महिला उद्येजिकेसाठी पुरस्‍कार सुरु करावा यासाठी देणगी दिली आहे.

सुशांत कुंकळयेकर

Donation

मडगावातील प्रसिद्ध उद्योजक आणि उल्‍हास ज्‍वेलर्स या प्रसिद्ध सुवर्ण आस्‍थापनाचे मालक उल्‍हास वेर्लेकर आणि त्‍यांच्‍या पत्‍नी मीता वेर्लेकर यांच्‍या लग्‍नाचा सुवर्ण महोत्‍सवी वर्ष समारोह ९ मे रोजी पार पडला.

यानिमित्त या कुटुंबियांकडून गोव्‍यातील वेगवेगळ्‍या शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाख रुपयांची देणगी देऊन त्‍यातून वेगवेगळे उपक्रम राबविण्‍यास सांगितले.

या संस्‍थांमध्‍ये काेंकणी भाषा मंडळाचा समावेश असून या संस्‍थेने उत्‍कृष्‍ट महिला उद्येजिकेसाठी पुरस्‍कार सुरु करावा यासाठी देणगी दिली आहे.

अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्‍मण युवा संघटनेला उत्‍कृष्‍ट खेळाडूचा सत्‍कार करण्‍यासाठी, दैवज्ञ ब्राह्‍मण समाज सेवा संघाला दहावीच्‍या विद्यार्‍थ्‍यांचा गौरव करण्‍यासाठी विद्याविकास मंडळाला उत्‍कृष्‍ट खेळाडूला सन्‍मानीत करण्‍यासाठी, दैवज्ञ समाजाला वैद्यकीय परिक्षेतील विद्यार्‍थ्‍यांना मदत करण्‍यासाठी, मठग्रामस्‍थ हिंदू सभेला शैक्षणिक कार्यासाठी,

ज्ञानेश्र्‍वरी महिला मंडळाला महिला प्रकल्‍पांना उत्तेजन देण्‍यासाठी, गोमंतक दैवज्ञ ब्राह्‍मण समाजोत्‍कर्ष मंडळाला उत्‍कृष्‍ट खेळाडू, उद्योजक, हुशार विद्यार्थी आणि सांस्‍कृतिक क्षेत्रात काम करणार्‍याला सन्‍मानीत करण्‍यासाठी, गोमंत विद्या निकेतनला सांस्‍कृतिक कार्यासाठी तर द गोवा हिंदू असोसिएशनच्‍या स्‍नेहमंदीर या संस्‍थेला वृद्धाश्रम चालविण्‍यासाठी ही मदत करण्‍यात आली आहे.

उल्‍हास वेर्लेकर हे स्‍व. शंकर शेट वेेर्लेकर यांचे पणतू असून 1933 साली शंकर शेट वेर्लेकर यांनी मठग्रामस्‍थ हिंदू सभेची स्‍मशानभूमी उभारण्‍यासाठी मदत केली होती. त्‍या प्रित्‍यर्थ त्‍यांचा एक अर्धपुतळा या स्‍मशानभूमीत उभारण्‍यात आला आहे.

वेर्लेकर यांच्‍या सुवर्ण महोत्‍सवी विवाह वर्ष सोहळ्याच्‍या निमित्ताने या जागेची डागडुजी करण्‍याबराेबरच स्‍मशानभूमी आवारात 50 रोपटी लावण्‍यात आली. यावेठी मठग्रामस्‍थ हिंदूसभेचे अध्‍यक्ष भाई नायक तसेच अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते.

वेर्लेकर कुटुंबियांतर्फे उल्‍हास वेर्लेकर यांचे पुत्र प्रितम व त्‍यांची पत्‍नी मीताली, त्‍यांचे दुसरे पुत्र विक्रम व त्‍यांच्‍या पत्‍नी श्र्‍वेता, त्‍यांच्‍या कन्‍या टीना रोहित वेर्लेकर मेहता आणि नातवंडे उपस्‍थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Panchayat Construction : कचरा कंत्राटदारांवर आता 'जीपीएस'ची नजर; विकसित गोवा पंचायत संमेलनात मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन!

Lakshmi Narayan Rajyog: "बुध-शुक्राची जुळली युती, लक्ष्मी नारायण योगाची प्राप्ती!" परदेश प्रवासासोबत अचानक धनलाभाचे संकेत

Goa Murder Case: स्वीडिश पर्यटकाच्या आईचा लढा अपयशी? कोर्टाकडून सीबीआयचा 'क्लोजर रिपोर्ट' मंजूर; हत्येचा पुरावा न मिळाल्यानं तपास बंद

जम्मू-काश्मीर अन् लद्दाख दाखवले पाकिस्तानचा भाग, नेपाळ एअरलाईन्सच्या नकाशाने खळबळ; अखेर भारतीयांच्या संतापापुढे झुकली कंपनी

Goa IPL Betting: कांदोळीत आयपीएल सट्टेबाजीचा पोलिसांकडून पर्दाफाश! गुजरातच्या 4 बुकींना रंगेहाथ पकडलं; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT