India Energy Week 2024 Dainik Gomantak
गोवा

India Energy Week 2024 Goa: उर्जा सप्ताहात कमी किंमतीतील अत्याधुनिक उपकरणं दाखल

India Energy Week 2024 Goa: विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करुन अत्याधुनिक उपकरणे बनविण्यात येत आहेत.

Ganeshprasad Gogate

India Energy Week 2024 Goa: सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने या क्षेत्रात होणारे आविष्कार हे केवळ प्रदर्शनीपुरते मर्यादीत न राहता ते प्रत्येक घरात पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा विश्वास उर्जा सप्ताहात सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करुन अत्याधुनिक उपकरणे बनविण्यात येत आहेत. अशी काही उपकरणे या सप्ताहात पाहायला मिळाली. जी नव्या पिढीसाठी आकर्षणाचे केंद्र बनणार आहेत.

त्यात विविध कंपन्यांनी तयार केलेल्या बायोगॅस शेगड्या, अत्यंत कमी उर्जा लागणाऱ्या स्वयंपाक घरातील इंडक्शन्स, ‘इथेनॉवर चालणारी मालवाहतूक वाहने, इ मोटारसायकल आणि इ मोटो प्लस सायकलचा समावेश आहे.

‘प्रेस्ट्रीज’ची उर्जा बचाव शेगडी:-

या उर्जा सप्ताहमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार करणाऱ्या वस्तूही पाहायला मिळाल्या. त्यात सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरली ती प्रेस्ट्रीजची शेगडी. सध्या वापरात असलेल्या शेगड्या ह्या 2000 मेगाव्हॅट उर्जा खेचतात. मात्र ही नवी शेगडी केवळ 200 मेगा व्हॅटवर चालणार आहे.

उल्लेखनिय म्हणजे तिची किंमतही कमी असेल. उज्ज्वला योजनेर्तंत ती गावातील महिलापर्यंत पोहचविण्याचा विचार केला जात असल्याची माहिती कंपनीचे वितरण व्यवस्थापक पाटील यांनी दिली.

‘पेट्रोनेट’चा करार
पेट्रोनेट या कंपनीने ‘एलएनजी’ लिमिटेड व कतार एनर्जीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. पेट्रोनेट ही कंपनी भारतातील वायू क्षेत्रातील प्रमूख कंपनी असून कंपनीनीने गुजरात येथील देहेज येथे नैसर्गिक वायूचे 17.5 एमएमटीपएलचे टर्मिनल स्थापन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कदंब बस मागे घेत असताना टायर गेला गटारात, वाहतुकीवर परिणाम

Digambar Singbal: स्वतंत्र प्रतिभेचे दिग्दर्शक! कोकणी नाटकांची प्रतिमा बदलणारे 'दिगंबर सिंगबाळ'

Goa Cabinet: संवेदनशील खात्यांची धुरा CM सावंतांकडे! ‘पुरातत्व, पुराभिलेख’ची जबाबदारी; ‘निर्णायक नेता’ म्हणून होणार प्रतिमा दृढ

Goa: '..अन्यथा अनुदान थांबवू'! कचरा विषयावर सरकार गंभीर; होणार कठोर कारवाई

F16 Crash Video: पोलंडमध्ये F16 फायटर जेट क्रॅश; पायलटचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT