Goa Rain Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Alert: गोव्यात गुरुवारपासून चार दिवस पावसाची शक्यता

Goa Rain Alert: गेल्या महिन्यात आलेल्या अवकाळीमुळे पणजी जलमय झाली होती.

Pramod Yadav

Goa Rain Alert

गोव्यात येत्या गुरुवारपासून (०९ ते १२ मे) चार दिवस पावसाची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील असे, हवामान खात्याने म्हटले आहे.

गोवा हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गोव्यात पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामान पाहायला मिळेल. यासह राज्यात ढगाळ वातावरण असेल, असे खात्याने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अवकाळीने झोडपले

गोव्यात एप्रिलमध्ये आलेल्या अवकाळी पावसाचा फटका पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांना बसला तसेच, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले. २१ एप्रिल रोजी दोन्ही जिल्ह्यात जोरदार अवकाळी बरसला, यामुळे स्मार्ट सिटीत विविध ठिकाणी पाणी साचले होते.

राज्यात तापामानात काही प्रमाणात घट झाली असली तरी उकाड्यापासून दिलासा मिळालेले नाही. उकाड्यामुळे त्रस्त नागरिक शीतपेयांचा सहारा घेत आहेत.

दरम्यान, पावासामुळे राज्यात तापमानापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT