Illegal Cattle Slaughter Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Cattle Slaughter Goa: सुरावलीत गुपचूप चालली होती जनावरांची बेकायदेशीर कत्तल, कर्नाटकच्या दोघांना रंगेहाथ पकडलं; गोवा पोलिसांची धडक कारवाई

Colva Police Arrest Seraulim: सुरावली येथे बेकायदेशीररित्या बैलाची कत्तल केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी शुक्रवारी दोन संशयित आरोपींना रंगेहाथ अटक केली.

Manish Jadhav

पणजी: सुरावली येथे बेकायदेशीररित्या बैलाची कत्तल केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी शुक्रवारी दोन संशयित आरोपींना रंगेहाथ अटक केली. सुरावलीतील एका गोठ्याजवळ ही कारवाई करण्यात आली. राज्यात गोवंश आणि जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलीला बंदी असतानाही हा प्रकार सुरु असल्याचे पोलिसांच्या कारवाईमुळे उघडकीस आले.

या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी कोलवा पोलीस ठाण्याचे पथक नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना सुरावली येथे बेकायदेशीरपणे जनावराची कत्तल केली जात असल्याची खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना दोन व्यक्ती एका बैलाची कत्तल करताना रंगेहाथ आढळून आले. पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता त्या दोघांनाही घटनास्थळावरुनच ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची ओळख पटली असून, यामध्ये सुकूरभाट-साष्टी येथे राहणारा 35 वर्षीय दादापीर के. कलाईगार आणि फोंडा येथे राहणारा 20 वर्षीय मोहम्मद उम्मर तरीन यांचा समावेश आहे. हे दोन्ही संशयित मूळचे कर्नाटकचे (Karanataka) रहिवासी आहेत. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले. तसेच, कत्तल केलेल्या बैलाच्या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले, ज्यांनी या प्रकरणाला अधिकृत दुजोरा दिला.

या गंभीर गुन्ह्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 325 सह कलम 3(5) आणि गोवा प्राणी संवर्धन कायदा, 1995 च्या कलम 8 अन्वये गुन्हा दाखल केला. ही यशस्वी कारवाई पीएसआय प्रथमेश महाले, पीएसआय निखिल खाजनेकर, पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान गावकर आणि नागेश कांबळे यांच्या पथकाने, पोलीस निरीक्षक विद्येश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या मोहिमेवर साष्टीचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक (SP) संतोष देसाई यांनी देखरेख ठेवली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT