मुरगांव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जवळ 'द पीयर' रेस्टॉरंटचे उद्घाटन करताना जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक. सोबत राजीव जलोटा व इतर. Dainik Gomantak
गोवा

Goa: मी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी केलेली नाही; श्रीपाद नाईक

मुरगांव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जवळ 'द पीयर' रेस्टॉरंटचे उद्घाटन जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: मी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी केलेली नाही. भविष्यातही करणार नाही. मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी द्यावी की नाही हे श्रेष्ठींनी ठरविले पाहिजे. कसलीही जबाबदारी दिल्यास ती योग्यरित्या पार पाडण्यास समर्थ आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. आता जी जबाबदारी दिली आहे ती योग्यरित्या पार पाडीत असल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे शुक्रवारी कार्यक्रमानंतर पत्रकारांना एका कार्यक्रमानंतर सांगितले.

मुरगांव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जवळ 'द पीयर' रेस्टॉरंटचे उद्घाटन जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून एमपीटीचे अध्यक्ष राजीव जलोटा (आय.ए.एस.) व कॅप्टन ऑफ पोर्टचे कॅप्टन जेम्स ब्रागांझा तसेच किरण ठाकूर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. कुंभारजुवे मतदारसंघातील उमेदवारासाठी केंद्रीय निवड समिती योग्य तो निर्णय घेईल. जे चांगले उमेदवार असतील त्यांची नावे निवड येणाऱ्या समिती केंद्रीय समितीकडे पाठवतात. त्यानंतर ते योग्य त्या उमेदवाराची निवड करतात. कुंभारजुवे किंवा इतर मतदारसंघातील उमेदवार कोण हे आम्ही ठरवू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येथील पर्यटनविषयक साधन सुविधासंबंधी जे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत त्यासंबंधी लवकरच कार्यवाही होईल. गोव्यात पर्यटनविषय साधनसुविधा वाढविण्यासाठी राज्य सरकारने केंद्र व केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहकार्याने हे घ्यावे.यासंबंधी राज्य सरकारकडे बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगाव बंदरातील बंद झालेली कंटेनर सेवा पुन्हा सुरू झाली आहे. कंटेनर सेवेला उर्जा लाभावी यासाठी आम्ही केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने आवश्यक असलेल्या क्रेनची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT