Santa Cruz Worker Issue Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz Worker: कचरा गोळा करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात; मानवी आयोगाची बीडीओ, पंचायत सचिवांना नोटीस

Santa Cruz Goa Sanitation Worker Issue: सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील कचरा जमा करण्यासाठी नेमणूक केलेल्या कामगारांना हातमोजे तसेच गमबूट यासारख्या आवश्‍यक मूलभूत उपकरणांचा पुरवठा केला नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील कचरा जमा करण्यासाठी नेमणूक केलेल्या कामगारांना हातमोजे तसेच गमबूट यासारख्या आवश्‍यक मूलभूत उपकरणांचा पुरवठा केला नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आहे.

यासंदर्भात स्थानिक पंच इनासिओ डॉमनिक परेरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत गोवा मानवी हक्क आयोगाने तिसवाडी गटविकास अधिकारी (बीडीओ) व सांताक्रुझ पंचायत सचिवांना नोटीस बजावली आहे. नोटिशीला २० जून २०२५ पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी २६ जूनला ठेवली आहे.

सांताक्रुझ पंचायतीने मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) उभारून काम जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटी कामगार घेतले आहेत. या कामगारांना आवश्‍यक असलेले मूलभूत उपकरणे पुरवण्यात आलेली नाही. त्यामध्ये मास्क, बूट किंवा गणवेश देण्यात आलेला नाही. त्यांची एमआरएफच्या ठिकाणीच काही अंतरावर राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे कामगारांना (Worker) अस्वच्छता असलेल्या भागात राहण्याची नामुष्की ओढवली आहे.

गेल्या एप्रिलमध्ये सांताक्रुझ पंचायत तसेच गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात तक्रारी देऊनही कोणतीच दखल घेतली नाही. ते ज्या परिस्थितीत कचरा जमा करत आहेत ते पाहून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत असे तक्रारीत परेरा यांनी म्हटले आहे.

आरोग्यासंदर्भातील मुद्यांकडे दुर्लक्ष

गटविकास अधिकारी व सांताक्रुझ पंचायतीने या कामगारांच्या आरोग्यासंदर्भातील मुद्यांकडे दुर्लक्ष केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्या सुविधा कामगारांना द्यायच्या आहेत त्या कंत्राटदाराने पुरवठा करण्याची गरज आहे. त्याचा पंचायतीशी काही संंबंध नाही, अशी भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची निकड व गांभीर्य लक्षात घेता व या कामगारांना आरोग्याचा (Health) धोका निर्माण होऊ नये म्हणून आयोगाने यामध्ये हस्तक्षेप करत दखल घ्यावी, असे परेरा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT