Goa Horticulture Department Dainik Gomantak
गोवा

Goa Horticulture Department: शिळी, खराब भाजी आढल्यास आता दुकानावर होणार कारवाई; प्रेमेंद्र शेट यांची माहिती

भाजीपाल्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी विभाग प्रयत्नशील....

Kavya Powar

Goa Horticulture Department: फलोत्पादन विभागांतर्गत येणाऱ्या दुकानांमध्ये मिळणारा भाजीपाला खराब दर्जाचा असल्याचा दावा स्थानिकांनी केला. त्यासोबतच वाढत्या दरांनी सामन्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याची खंतही व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत फलोत्पादन विभागाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

फलोत्पादन विभागातर्फे एक हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. फलोत्पादन विभागांतर्गत येणाऱ्या दुकानांमधून ग्राहकांना जर खराब किंवा शिळा भाजीपाला मिळत असेल तर सदर हेल्पलाईन क्रमांकावर त्याचे फोटो पाठवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

खराब दर्जाची भाजी मिळत असल्यास ग्राहक दुकानाबाबत तक्रार करू शकतात, अशी माहिती प्रेमेंद्र शेट यांनी दिली आहे.

भाजीपाल्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी विभाग प्रयत्नशील....

भाजीपाल्याचे गगनाला भिडणारे दर सामान्यांना त्रासदायक ठरत आहेत. याबाबत प्रेमेंद्र शेट म्हणाले की, हे दर निश्चित करून स्थिर ठेवण्यासाठी आम्ही चर्चा करत आहोत.

प्रत्येकाला परवडतील असेच दर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

Bhumi Pednekar: 'मी मूळची पेडण्याची, मला गोव्याची असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो'; अभिनेत्री भूमी पेडणेकरनं सांगितलं गोवा कनेक्शन

SCROLL FOR NEXT