Car Chase Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: आमदार आमोणकरांचा 'फिल्मी' स्टाईल पाठलाग! दाबोळीत महिलेला चिरडून पळणाऱ्या कारचालकावर घातली झडप; 12 किमी पाठलाग करुन पकडलं

Car Chase: येथील दाबोळी विमानतळासमोरील रस्त्यालगत शनिवारी (ता. २) रात्री उभ्या असलेल्या सिद्धम्मा मदार (६०,रा. मांगोरहील) दिला कारची जोरदार धडक देऊन कारसह पळ काढला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: येथील दाबोळी विमानतळासमोरील रस्त्यालगत शनिवारी (ता. २) रात्री उभ्या असलेल्या सिद्धम्मा मदार (६०,रा. मांगोरहील) दिला कारची जोरदार धडक देऊन कारसह पळ काढला. मात्र, ‘हिट ॲंड रन’ प्रकरण दिसताच आमदार संकल्प आमोणकर यांनी १२ किमी. पाठलाग करून चालक सचिन चोप्रा (रा. मूळ उज्जैन)याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.आमोणकर यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

चालकावर दोन गुन्हे

गंभीर जखमी झालेल्या सिध्दम्माला उपचारार्थ चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. परंतु तेथे मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे निष्काळजीपणेवाहन हाकून मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी सचिन चोप्रा विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच अपघातानंतर पळ काढल्याप्रकरणीही गुन्हा दाखल केला आहे.

अपघात झाल्यावर जखमीला वैद्यकीय मदत करणे व पोलिसांना माहिती देणे हे महत्त्वाचे असते. काही वाहनचालक अपघातानंतर पळ काढतात. माहिती लपवतात. त्यामुळे जखमीला उपचार मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे त्या चालकाविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद होतो. एखादा चालक अपघातानंतर पळ काढण्याचा प्रयत्न करीत असेल, तर वाहन क्रमांक नोंद करून तो पोलिसांना द्यावा. जखमीला वैद्यकीय मदत देण्याचे प्रयत्न करावेत,

- गुरुदास कदम, पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT