Goa Hindon Flight Dainik Gomantak
गोवा

Goa Hindon Flight: गोवा ते हिंडन थेट विमानसेवा मार्चपासून सुरु होणार; वेळापत्रक, तिकिटदर जाणून घ्या

Direct Flight From Hindon airport: हिंडन विमानतळावरुन देशातील तीन प्रमुख ठिकाणांना थेट विमानसेवा सुरु केली जाणार आहे.

Pramod Yadav

पणजी: आता दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी हवाई मार्ग उपलब्ध करण्याचे एअर इंडियाने ठरविले आहे. गोवा ते हिंडन या हवाई मार्गावर एक मार्चपासून एअर इंडिया विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय राजधानी विभागात दिल्लीलगत गाझियाबाद येथे हिंडन येथे विमानतळ आहे.

एअर इंडियाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हिंडन विमानतळावरुन देशातील तीन प्रमुख ठिकाणांना थेट विमानसेवा सुरु केली जाणार आहे. यामध्ये बंगळुरु, गोवा आणि कोलकाता या यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे एक दिवस वगळता सर्व ठिकाणांवर दररोज ही सेवा सुरु राहणार आहे. ०१ मार्चपासून विमानसेवा नियमित सुरु होणार आहे.

असे आहे वेळापत्रक

हिंडन ते बंगळुरु - ३.४५ मिनिटांनी सुटणार ६.४० वाजता पोहोचणार.

बंगळुरु ते हिंडन - १२.४० वाजता सुटणार आणि सव्वा तीन वाजता पोहोचणार.

गोवा - हिंडन - गोवा (Goa - Hindon - Goa) 

हिंडन ते गोवा- सकाळी साडे दहा वाजता सुटणार आणि दुपारी सव्वा एक वाजता पोहोचणार.

गोवा ते हिंडन - दुपारी दोन वाजता सुटणार आणि ४ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार

हिंडन ते कोलकाता- ५.२० वाजता सुटणार आणि सायंकाळी ७. ४० वाजता पोहोचणार.

कोलकाता ते हिंडन - सकाळी ७.१० मिनिटांनी सुटणार सकाळी साडे नऊ वाजता पोहोचणार.

असे असतील तिकिटदर (Ticket Rate)


हिंडन ते बंगळुरु - ६,२००

बंगळुरु ते हिंडन - ६,०००

हिंडन ते गोवा- ४,९००

गोवा ते हिंडन - ४,९००

हिंडन ते कोलकाता- ४,४००

कोलकाता ते हिंडन - ५,५००

या विमानसेवेसाठी तिकिट बुकिंग सुरु झाले असून, प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करता येईल किंवा एअर इंडिया एक्सप्रेस च्या या संकेतस्थळावर बुकिंग करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT