Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: 'एफआयआर'साठीही कोर्टाची पायरी? गोवा खंडपीठाचा पोलिसांना संतप्त सवाल; पोलिस कारभारावर ओढले ताशेरे

Goa High Court FIR delay: नागरिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तत्परतेने ‘एफआयआर’ नोंदविण्याऐवजी विलंब करणाऱ्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नागरिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तत्परतेने ‘एफआयआर’ नोंदविण्याऐवजी विलंब करणाऱ्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सामान्य नागरिकांनी तक्रार घेऊन पोलिसांकडे गेल्यानंतरही गुन्हा नोंदवला जात नसेल, तर त्यांनी न्यायासाठी थेट न्यायालयातच धाव घ्यायची का, असा संतप्त सवाल न्यायालयाने केला.

बोरी, फोंडा येथील श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त दिनेश रायकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तक्रार दाखल केल्यानंतर ‘एफआयआर’ नोंदविण्यासाठी पोलिसांना इतका वेळ का लागतो, असा सवाल न्यायालयाने केला. नागरिक तक्रार घेऊन पोलिसांकडे गेल्यानंतर त्वरित गुन्हा नोंदविणे अपेक्षित असताना त्यात दिरंगाई केली जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

१ ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश रायकर यांच्या तक्रारीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता बोरी-फोंडा येथील श्री साईबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली. दिवाणी न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असतानाही अक्षय नाईक, कमलाकर नाईक, अभिराज नाईक, सूरज नाईक, शांताराम नाईक, सनी नाईक, आनंद नाईक, वासुदेव नाईक, दीपक रायकर यांच्यासह सुमारे ३० अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या जमाव करून मंदिरात प्रवेश केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

२ या व्यक्तींनी मंदिराचे जुने कुलूप तोडून नवीन कुलूप लावले. तसेच मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून सीसीटीव्ही डीव्हीआरमधील दोन हार्ड डिस्क आणि संगणकाच्या दोन हार्ड डिस्क घेऊन गेल्याचा आरोप आहे. याशिवाय मंदिरातील कर्मचारी कल्लाप्पा पाटील आणि मानस ज्योती यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनंतर १० दिवसांनी ‘एफआयआर’

या प्रकरणात फोंडा पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल १० दिवसांनी ‘एफआयआर’ नोंदविला. या विलंबाची गंभीर दखल घेत न्यायालयाने फोंडा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

अशा प्रकारची प्रकरणे वारंवार न्यायालयासमोर येत असल्याबद्दलही खंडपीठाने चिंता व्यक्त केली. ‘एफआयआर’ नोंदविण्यास झालेल्या विलंबाचे कारण तसेच आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT