Goa High Court Dainiak Gomantak
गोवा

Goa High Court: ‘खुली सुधारसंस्था’ सुरू करा! न्यायालयाचे सरकारला निर्देश; पुढील सुनावणी जूनमध्ये

Justice Valmiki Menezes Goa: गोव्यातील कारागृह सुधारणांच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने महत्त्वाचे पाऊल उचलत राज्याने केवळ ‘निम-खुले कारागृह’ प्रस्तावित न ठेवता, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘खुली सुधारसंस्था’ (ओपन कॉररेक्शनल इन्स्टिट्यूशन) स्थापन करण्यासाठी अहवाल तयार करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्यातील कारागृह सुधारणांच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने महत्त्वाचे पाऊल उचलत राज्याने केवळ ‘निम-खुले कारागृह’ प्रस्तावित न ठेवता, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘खुली सुधारसंस्था’ (ओपन कॉररेक्शनल इन्स्टिट्यूशन) स्थापन करण्यासाठी अहवाल तयार करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जून २०२६ रोजी निश्चित केली आहे.

दरम्यान, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील ‘राज्य देखरेख समिती’च्या स्थापनेची प्रक्रिया सुरू असून, त्यात गृह सचिव आणि कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश १२ मेपर्यंत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘सुहास चकमा विरुद्ध केंद्र सरकार’ या खटल्यातील निकालाच्या अंमलबजावणीवर उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

तज्ज्ञांची समिती स्थापन

या प्रक्रियेला गती देण्यासाठी उच्च न्यायालयाने पाच सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये अनुप गाडगीळ (वास्तुविशारद), फादर मेव्हरिक फर्नांडिस (संचालक, प्रिझन मिनिस्ट्री ऑफ इंडिया - गोवा विभाग), प्रा. जोआना परेरा कुएल्हो (समाजशास्त्र विभाग, गोवा विद्यापीठ) आणि एक वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ (आयपीएचबी, गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत नामनिर्देशित) यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती १५ जून २०२६ पर्यंत आपला आराखडा ‘राज्य देखरेख समिती’कडे सादर करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT