Noise Pollution Dainik Gomantak
गोवा

Noise Pollution: नरकासुर कलेला प्रोत्साहन, ध्वनिप्रदूषणाला लगाम; गोवा खंडपीठाचे महत्त्वपूर्ण निर्देश

Narakasur Festival: दिवाळीनिमित्त आयोजित नरकासुर उत्सवातील ध्वनिप्रदूषण आणि रात्रीच्या वेळेच्या निर्बंधांबाबत दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांची यादी सादर करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दिवाळीतील नरकासुर प्रतिमा तयार करण्याची अद्वितीय पारंपरिक कला टिकवून तिचे संवर्धन करण्यासाठी सहभागी मंडळांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात यावीत, अशी महत्त्वपूर्ण सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केली आहे. मात्र, ही बक्षिसे देताना ध्वनी मर्यादेचे निकष पाळणे बंधनकारक राहावे आणि त्यासाठी एक विशिष्ट मर्यादा निश्चित केली जावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दिवाळीनिमित्त आयोजित नरकासुर उत्सवातील ध्वनिप्रदूषण आणि रात्रीच्या वेळेच्या निर्बंधांबाबत दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांची यादी सादर करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये पोलिसांनी गोळा केलेली माहिती तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या उल्लंघनाच्या तक्रारींचाही समावेश करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. हा संपूर्ण अहवाल २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जोस लोबो आणि इतरांनी गोवा सरकार व इतरांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. न्यायालयाने ७ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या आपल्या अंतरिम आदेशाचा संदर्भ देत स्पष्ट केले की, आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासोबतच उल्लंघन करणाऱ्यांची नावे न्यायालयाला कळवावीत.

२५ नोव्हेंबरची मुदत

उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांना याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये संबंधित कायदा आणि नियमांनुसार कोणाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे का किंवा तपास सुरू केला आहे का? हा गुन्हा नेमक्या कोणत्या पोलिस स्थानकात नोंदवला गेला आहे?, तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तपासाचा कोणता टप्पा गाठला आहे? हे सर्व अहवालात समाविष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ज्या प्रकरणांमध्ये खटला सुरू करण्यात आला आहे, त्याचे आरोपपत्र देखील न्यायालयात सादर करण्याचे निर्देश जरी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: 4 डिसेंबरपासून 'या' 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु! बुध गोचरमुळे होणार तगडा फायदा; चांगल्या दिवसांची नांदी

Goa Equality Index 2026: 28 राज्यांत गोवा नंबर 1! आरोग्य, मूलभूत सुविधा आणि समान संधींच्या निर्देशांकात बाजी

Daily Horoscope: कामाच्या ठिकाणी नवीन संधी ते अचानक धनलाभ! सकारात्मकता आणि संयमाचा दिवस; 'या' राशींसाठी शुक्रवार अत्यंत खास

खरी कुजबुज: राजकीय इच्छा विरुद्ध जनहिताची खरी कसोटी!

Tiger in Surl Charavane: सुर्ला-चरावणेत वाघाने गाईचा फडशा पाडला; राजेंद्र केरकरांचे वन खात्याला संरक्षणासाठी साकडे

SCROLL FOR NEXT