Goa High Court Dainik Gomantak
गोवा

Goa High Court: गोवात नवीन परिपूर्ण प्रादेशिक आराखडा तयार करा- विश्‍वजीत राणे

Goa News: नगरनियोजन कायदा दुरुस्ती विरोधात तब्बल 5 हजार हरकती दाखल केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Margao: तज्ज्ञ समितीसमोर मांडून नगर नियोजन कायद्यात येऊ घातलेल्या दुरुस्त्या आणि कलम ‘16 (ब)’ खाली मिळालेल्या जमीन रूपांतरण मंजुऱ्या रद्द करण्याची घोषणा नगर नियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने गोव्यातील विविध घटकांच्या आकांक्षा पूर्ण करणारा नवीन प्रादेशिक आराखडा तयार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या राज्यातील जमीन वापर प्रादेशिक आराखडा 2021 नुसार केली जात असला तरी प्रत्यक्षात हा आराखडा अजून कार्यान्वित झालेला नाही. त्यातूनच आता या आराखड्यातील त्रुटी बाजूला काढून नवीन आराखडा तयार करा, अशी मागणी यापूर्वी प्रादेशिक आराखड्यावर आंदोलन उभारणाऱ्या गोवा बचाव आंदोलन (जीबीए)या संघटनेने केली आहे.

या आंदोलनाच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स यांनी गोव्यातील विविध घटकांच्या आकांक्षा पूर्ण करणारा प्रादेशिक आराखडा तयार होण्याची गरज व्यक्त केली. तर आर्किटेक्ट रोयला फर्नांडिस यांनी, हा आराखडा कसा असावा?, याच्या सूचना ग्रामसभेकडून घ्याव्यात अशी सूचना केली. ‘स्वतः जीबीएने या दुरुस्त्यांना विरोध करणाऱ्या 26 हरकती दाखल केल्या आहेत.

काल हरकती आणि सूचना मांडण्यासाठी शेवटची तारीख होती. आतापर्यंत किमान 5 हजार हरकती दाखल झाल्या असाव्यात’, अशी माहिती रेनबो वॉरियर्सचे अभिजित प्रभुदेसाई (Rainbow Warriors Abhijit Prabhudesai) यांनी दिली.

हवामान बदल हा महत्त्वाचा मुद्दा

नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याची गरज आहे, ही आमची जुनीच मागणी आहे. मात्र, हा आराखडा तयार करताना स्थानिक पंचायतींना विश्‍वासात घ्यावे. शिवाय हवामान बदल हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले. एडगर रिबेलो समितीने जसा ग्राम पातळीवर जाऊन आराखडा तयार केला होता, ती प्रक्रिया आता सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

संभ्रम कायम: टीसीपी कायदा दुरुस्त्या बरोबरच ‘16 (ब)’ कायद्याला आणलेली दुरुस्ती रद्द केली जाणार, अशी घोषणा मंत्री राणे यांनी केली होती. मात्र, काल मंगळवारी त्यांनी या दुरुस्त्या तज्ज्ञ समितीसमोर मांडल्या जातील, असे सांगितले. यामुळे सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT