Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

Goa : गोव्यातील मनोरंजन उद्योगाला मदत करा - लुईझीन फालेरो

या कलाकारांसाठी (Artists) व्याजमुक्त कर्ज योजना तयार करावी व त्यांना फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी असे फालेरो यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा - सद्याच्या या कोविड महामारीच्या (Covid Pandemic) काळात मनोरंजन उद्योगाला (Entertainment industry) जबरदस्त नुकसान सोसावे लागत आहे. राज्य सरकारने गोमंतकीय संगीत (Music), गायक (Singer) व मनोरंजन (Entertainment) करणाऱ्या कलाकारांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो (MLA Luizinho Faleiro) यांनी सरकारला केली आहे.

गोवा मनोरंजन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत फालेरो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या कलाकारांसाठी व्याजमुक्त कर्ज योजना तयार करावी व त्यांना फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी असे फालेरो यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविले.

करोनाच्या परिस्थितीत कलाकारांना कुठलेही कार्यक्रम करता येत नाहीत त्यामुळे त्यांच्या मिळकतीला खिळ बसलेली आहे. उदरनिर्वाहासाठी कलाकारांना वणवण फिरावे लागते.

कर्फ्यु, राज्यात लागू केलेल्या 144 कलमामुळे व सामाजीक अंतराची अट असल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम, नृत्य व विवाह संमारंभ करता येत नाही, त्यामुळे कलाकारांचे उत्पन्न घटले आहे , असे गोवा मनोरंजन असोसिएशनचे अध्यक्ष हर्शेल मास्कारेन्हस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT