Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पुढचे 5 दिवस पावसाचे! राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी; तीव्रता वाढण्याची शक्यता

Goa Monsoon: गोवा राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी आणि नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना काळजी घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या जोरामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

मागचे काही दिवस राज्यात, पणजी परिसरात अनेक ठिकाणी रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वेधशाळेने यापूर्वी ११ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘ग्रीन अलर्ट’ घोषित केला होता.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना पूरप्रवण भागात सावधगिरी बाळगण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पणजी, मडगाव, फोंडा, वास्को आणि परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेती, मासेमारी आणि वाहतूक क्षेत्रांनाही हवामानातील बदलांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

SCROLL FOR NEXT