Vishwajit Rane
Vishwajit Rane 
गोवा

मंत्री विश्वजीत राणेंकडून सत्तरीकरांसाठी गुड न्यूज; 15 हजार नागरिकांना घडवणार अयोध्या दर्शन

Pramod Yadav

Vishwajit Rane: अयोध्येत श्री राम लल्लांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील नेते, अभिनेते, उद्योगपती नामांकित लोकांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजेरी लावली. गोव्यात देखील मोठ्या उत्साहात लोकांनी हा सोहळा साजरा केला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सरकारमधील नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात उत्सव साजरा केला. दरम्यान, मंत्री विश्वजीत राणे यांनी सत्तरीतील नागरिकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे.

'येत्या तीन वर्षात सत्तरी-ऊसगाव मधील 15 हजार नागरिकांनी अयोध्येतील राम मंदिर दर्शन घडवले जाणार आहे. फेब्रुवारीपासून प्रत्येक आठवड्यात एक फेरी अयोध्येला रवाना होईल,' अशी माहिती राणे यांनी दिली आहे.

'राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आज सायंकाळी सत्तरीत 45 हजार दिवे लावले जाणार आहेत, हा देखील एक ऐतिहासिक क्षण असेल,' असे राणे म्हणाले.

अयोध्येतील राममंदिरात भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर वाळपई येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लहान मुलांनी श्रीराम, जानकी आणि भगवान लक्ष्मण अशी वेशभूषा केली होती. ढोल-ताशांचा गजरात उपस्थित लोक 'जय श्री राम' अशा घोषणा दिल्या.

गोव्यात आज सर्वत्र उत्साहाचा वातावरण पाहायला मिळाले. गावागावांत मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करुन आरती आणि पूजा करण्यात आली. सर्व मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मुख्य चौकांत श्री रामाचे पोस्टर उभारण्यात आले आहेत.

भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज रात्री सर्वत्र दिवे लागण केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT