Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, सर्वजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
'हा क्षण म्हणजे मंदिर वहीं बनाएंगे वचनपूर्तीचा, भारतीय सभ्यतेच्या पुनरुत्थानाचा आहे,' अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा साक्षीदार होणे हा आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण म्हणजे भारतीय सभ्यतेचे पुनरुत्थान, पुनर्जागरण आणि मंदिर वहीं बनाएंगे या वचनपूर्तीचा आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने मी सर्व कारसेवक आणि ज्यांनी हे स्वप्न साकार करण्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो व शुभेच्छा देतो."
'आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत. आता रामलला भव्य मंदिरात राहणार आहेत. मला विश्वास आहे की प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील. आज आमचा राम आला आहे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आज आपल्याला श्री रामाचे मंदिर सापडले असून, गुलामगिरीची मानसिकता मोडून राष्ट्र उभे राहिले आहे. प्रदीर्घ वियोगामुळे आलेला त्रास आता संपला आहे. राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून कायदेशीर लढाई लढली गेली, असे मोदींनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.