Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: नवजात बालकांची 72 तासांत 5 आजार, 46 विकार तपासण्यासाठी चाचणी करणार; आरोग्यदायी राज्यासाठी पाऊल

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची माहिती

Akshay Nirmale

Vishwajit Rane: गोवा सरकारने नवजात बालकांसाठी एक महत्वाचे पाऊल उचचले आहे. त्यानुसार आता गोव्यात सरकारी रूग्णालयात जन्माला येणाऱ्या बालकांवर 72 तासांमध्ये 5 आजारांच्या तसेच 46 विकारांच्या तपासणीसाठी चाचण्या करण्यात येणार आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी ही माहिती दिली. मंत्री राणे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, या नवीन उपक्रमासाठी निविदा जारी करण्यात आली आहे.

मंत्री राणे यांनी म्हटले आहे की, या तपासणीमुळे नवजात बाळाच्या वाढीतील अडथळे दूर होतील. त्याला हानी पोहोचवणारी परिस्थिती आधीच लक्षात येईल.

आरोग्यदायी राज्य निर्माण करण्याच्या आपल्या मिशनमध्ये सावधगिरीचे उपाय आवश्यक आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यापुढे राज्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे.

या तपासणीत 5 आजार आणि इतर 46 विकार शोधले जातील आणि जन्मानंतर पुढील 72 तासांत या चाचण्या केल्या जातील.

जन्मापासूनच उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. एखादा आजार, विकार लवकर ओळखणे हे मुलाच्या विकासासाठी, त्या आजारावर उपचारांसाठी उपयुक्त ठरू शकते. मुलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी याची मोठी मदत होऊ शकते, असेही मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT