Heart Attack Dainik Gomantak
गोवा

Heart Attack: धक्कादायक! गोव्यातील तरुणाई हृदयरोगाच्या विळख्यात; 30 ते 35 वर्षांच्‍या युवकांना धोका जास्त

Heart Attack: चिंताजनक बाब : 25 वर्षांपासूनच संभवतो धोका;

गोमन्तक डिजिटल टीम

अनिल पाटील

Raising Heart Attack in Goa: अलीकडच्‍या काळात युवकांमध्‍ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. गेल्‍या 20 वर्षांपूर्वी साधारणपणे 60 ते 70 वर्षांनंतर हृदयरोग झाल्याचे किंवा होत असल्याचे निदान होत असे.

पण आजची स्थिती वेगळी आहे. आज 25 ते 30वर्षे वयोगटातील तरुणाई हृदयरोगाच्‍या विळख्‍यात अडकत चालली आहे.

तर 30 ते 35वर्षे वयोगटात हृदयविकाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत आहे. मणिपाल रुग्णालयाच्या हृदयरोग विभागप्रमुख डॉ. ज्योती कुस्नूर यांनी ही माहिती दिली. जागतिक हृदयदिनाच्‍या पार्श्वभूमीवर त्‍या ‘गोमन्‍तक’शी बोलत होत्या.

पूर्वी वार्धक्यात एखाद्या शिरेमध्ये गाठी (क्लॉट) दिसून येत होते. आज तरुणाईत शिरांमध्ये गाठी दिसून येणे ही सामान्‍य बाब बनली आहे.

बदलती जीवनशैली, वाढता तणाव, अयोग्य आहार, झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणाईमध्ये हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

अलीकडच्‍या वर्षभरातील आकडेवारी तर वैद्यकीय क्षेत्राला चकीत करून सोडणारी आहे. मात्र योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेतल्यास या रोगापासून दूर राहता येते, असेही डॉ. कुस्नूर यांनी सांगितले.

हृदयरोग हा जीवनशैलीशी निगडित आहे. योग्य काळजी घेतली आणि वेळेत उपचार मिळाल्यास त्यावर 99.99 टक्के नियंत्रण मिळवता येते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

प्रामुख्याने अयोग्य आहार, जंकफूडचा मोठ्या प्रमाणात वापर, पिझ्झा, बर्गर, तेल आणि फॅट युक्त मांसाहार, तिखट व तळलेल्या पदार्थांचा वापर, व्यायामाचा अभाव ही हृदरोगाला निमंत्रण देणारी काही प्रमुख कारणे आहेत.

समतोल आहार घ्‍या; स्क्रीन टाईम कमी करा

आहारात सामान्यतः प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे, पालेभाज्‍या, ताजी फळे, कडधान्ये, दूध, अंडी, मासे यांचा समतोल प्रमाणात वापर असावा. सध्या मुलांकडे आणि तरुणाईकडे मोठ्या प्रमाणात मोबाईलसह इतर इलेक्ट्रिक गॅझेट्‌स आली आहेत.

याचा परिणाम झोपेवर आणि डोळ्यांवर होतो. पुरेशी झोप मिळत नाही. मग ट्रेस हार्मोन्स वाढत जातात. यासाठी स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. तरच मनाला आणि शरीराला पुरेशी विश्रांती मिळेल आणि आरोग्‍य निरोगी राहण्यास मदत होईल, असे डॉ. ज्योती कुस्नूर यांनी सांगितले.

सिक्स पॅक बॉडी बनविण्यासाठी काही युवक अयोग्य आहार घेतात. या बॉडीला आरोग्याच्या दृष्टीने काहीच अर्थ नाही. ती केवळ कॉस्मेटिक बॉडी असते.

हृदयरोग टाळण्‍यासाठी साधा व्यायाम आणि दररोज चालणे खूप महत्त्‍वाचे आहे. दररोज सकाळी किमान हा एक तासाचा व्यायाम नियमितपणे हवाच.

- डॉ. ज्योती कुस्नूर, हृदयरोग विभागप्रमुख (मणिपाल इस्‍पितळ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT