Monkeypox Virus in Goa Dainik Gomantak
गोवा

मंकीपॉक्सबाबत चिंता करण्याची गरज नाही : डॉ. बेतोडकर

Monkeypox Virus in Goa : आरोग्य प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

दैनिक गोमन्तक

पणजी : देशात अद्यापही मंकी पॉक्सचे बाधित रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे सध्या तरी चिंता करण्याची गरज नाही. मात्र गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याकारणाने राज्याचे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि जीएमसी रुग्णालयाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लक्षणे असलेला रुग्ण आल्यास आरोग्य यंत्रणेला कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे साथीचे रोग विभाग प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली आहे.

प्रामुख्याने मध्य आणि पूर्व आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या मंकीपॉक्स चे रुग्ण आता युरोप ऑस्ट्रेलियाबरोबर 19 देशांमध्ये आढळून आल्याने कोरोनाबरोबर या नव्या रोगाने जगभर भीती निर्माण केली आहे. सध्या तरी या रोगाचा रुग्ण राज्यात वा देशात सापडलेला नाही मात्र बाधित रुग्ण सापडलेल्या देशात घेऊन येणाऱ्या प्रवाशांबरोबर हा रोग देशात आणि राज्यात येवू शकतो अशी भीती आरोग्य यंत्रणेला आहे. संशयित रुग्ण सापडल्यास अशा रुग्णांसाठी स्वतंत्र अलगीकरण्याची सोय करण्याची तयारी सुरू झाली आहे. तसे पत्र आरोग्य विभागाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला लिहिले आहे.

सद्यस्थितीत ‘कोरोना’ संकटावर लक्ष

मंकी पॉक्स या रोगाची सध्याची स्थिती पाहता कोरोनाप्रमाणे याचा प्रसार झपाट्याने होत नाही. याशिवाय यामध्ये मृत्यूचे प्रमाणही अत्यल्प आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. सध्या तरी आम्ही कोरोना संकट पुन्हा येऊ नये, याकडे लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती साथ रोग विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT