CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Funds: गोव्याला आतापर्यंत 30,000 कोटी रुपयांचा निधी मिळालाय; CM डॉ. प्रमोद सावंत

Funds for Infrastructure Development: फोंडा येथील पीईएस कॉलेजजवळ विकसित भारत अंतर्गत आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित शेकडो तरुणांना ते संबोधित करत होते.

Pramod Yadav

Goa Funds

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला आतापर्यंत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 30,000 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

फोंडा येथील पीईएस कॉलेजजवळ विकसित भारत अंतर्गत आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित शेकडो तरुणांना ते संबोधित करत होते.

'केंद्राकडून मिळालेल्या निधीतून पत्रादेवी ते काणकोणपर्यंत महामार्गाचे काम करण्यात आले. अटल सेतू ते नवीन झुआरी पुलापर्यंतचा रस्ता तयार करण्यात आला. GMC येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी निधी मिळाला आहे.'

'गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या आग्वाद तुरुंगाचे नूतनीकरण आणि जतन करण्यात आले आहे. गोव्यात देशातील चौथे फॉरेन्सिक सायन्स कॉलेज सुरू करण्यात आले,' असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी उपस्थित तरुणांना भाजपच्या जाहीरनाम्यासाठी सूचना सादर करण्याचे आवाहन केले.

देशाला 2047 पर्यंत विकसित करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून येणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. यासाठी राज्यात संकल्प पत्र अभियाने राबविले जात असून नागरिकांकडून मौल्यवान सूचना मागविल्या जात आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या राज्यात संकल्प पत्र अभियासंबधित कार्यक्रम घेत आहेत. मडगाव, कुडतरी, फोंडा, सांगेसह विविध ठिकाणांना भेट देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT