ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: एसटी आरक्षणाचा प्रस्ताव गोव्याने केंद्राकडे पाठवलाच नाही- शिष्टमंडळाचा आरोप

यापूर्वी मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपले निवेदन सादर केले गेले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

ST Reservation मागील काही काळापासून गोव्यात ST समाजाला राजकीय आरक्षण मिळावे हा मुद्दा बराच गाजतोय. एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी यापूर्वी मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपले निवेदन सादर केले गेले होते.

गोव्यात एसटी बांधवांना अजून त्यांचा हा घटनादत्त अधिकार देण्यात आलेला नाही, याकडेही त्यांनी त्यावेळी लक्ष वेधले होते.

याबाबत एक अपडेट हाती येतेय, एसटीच्या शिष्टमंडळाचे असे म्हणणे आहे की, केंद्रीय मंत्री आणि भारतीय निवडणूक आयोगाला एसटी आरक्षणाबाबत त्यांनी माहिती दिली होती. मात्र गोवा सरकारने एसटी आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.

गोवा सरकारकडे ST समाजाला आरक्षण देण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही असा आरोप शिष्टमंडळाने पत्रकार परिषदेत केलाय.

ST समाजाला खरोखरच आरक्षण मिळावे असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी गोवा सरकारने केंद्राकडे योग्य तो प्रस्ताव पाठवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केलीय.

मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनच्या शिष्टमंडळाने यापूर्वी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. तसेच अनुसूचित जातीजमाती कल्याणासाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष डॉ. किरीट सोमजीभाई सोळंकी यांची देखील भेट घेऊन त्यांनाही हे निवेदन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT