Goa has good treatment facilities for Psychiatric  Dainik Gomantak
गोवा

कंटाळलो, न्या आता आम्हाला घरी..!

आरोग्य ठणठणीत झालेल्या इस्पितळातील 70 मनोरुग्णांची आर्त हाक

दैनिक गोमन्तक

पणजी: बांबोळी (Bambolim) येथील मनोरुग्णालयात (Psychiatric hospital) 70 हून अधिक परप्रांतीय व्यक्ती असून त्यांचे आरोग्य ठणठणीत असून ते आपल्या घरी जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्या नातलगांचे संपर्क क्रमांक बंद असल्याने व आपला पत्ता त्यांना आठवत नसल्याने त्यांची इच्छा असूनही त्यांना त्यांच्या घरी पाठवता येत नाही. आश्चर्याचे गोष्ट म्हणजे काही व्यक्तींचे नातेवाईक आपल्याला घरात त्रास नको म्हणून त्यांना मनोरुग्णालयातून घरी घेऊन जात नाहीत.

उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ म्हापसा व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ मडगाव येथे मानसिक आरोग्य तापसणी केली जाते व औषधे दिली जातात. जास्त उपचाराची गरज असलेल्या व्यक्तीला बांबोळी येथील मनोरुग्णालयात पाठवले जाते. बांबोळी येथे 12 वार्ड असून तेथे 200 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. दररोज 70 ते 80 व्यक्ती येथे तपासणीसाठी येतात. त्यातील 10 ते 15 व्यक्तींना इस्पितळात दाखल करून घेतले जाते.

जे 200 व्यक्ती बांबोळी मनोरुग्णालयात आहेत, त्यातील 70 व्यक्ती गेली 5 ते 10 वर्षे तेथे उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र, त्यांना त्यांच्या घराचा पत्ता आठवत नाही. तसेच त्यांच्या नातेवाईकांनी दिलेला संपर्क क्रंमाक लागत नाही. बरे झालेल्या व्यक्तींना रेल्वेत तिकीट काढून देऊन पाठवण्याचा प्रयोग यापूर्वी केला होता. मात्र, या व्यक्ती भलत्याच जागी पोचल्याने त्यांना पुन्हा आणावे लागले. सध्या या व्यक्ती ‘न्या हो मला घरी परत न्या!’ असा मनोमनी धावा करत कुणीतरी नातलग येऊन आपणास घेऊन जातील या आशेवर जगत आहेत.

सरकारने जे मनोरुग्ण बरे झालेत त्यांना त्यांच्या नातलगांचा शोध घेऊन त्यांच्या घरी पोचवण्यासाठी सोशल वर्कर नेमले आहेत. त्यांनी जबाबदारी घेऊन बांबोळी येथे बरे होऊनही नातलगांच्या संपर्काच्या अभावने अडकून पडलेत त्या व्यक्तींना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे किंवा अशा व्यक्तींना स्वयसेवी संस्थाकडे पोचवणे गरजेच आहे. अशा व्यक्तींना नातलगांच्या भावनीक आधाराची, प्रेमाची गरज असते

- डॉ. रुपेश पाटकर, उत्तर गोवा इस्पितळातील मनोरुग्ण तज्ज्ञ

उपचाराची चांगली सोय

इतर राज्यांच्या तुलनेने गोव्यात मनोरुग्णांवर उपचार करण्याच्या चांगल्या सोयी आहेत. दक्षिण गोवा व उत्तर गोवा सरकारी इस्पितळासोबतच बांबोळी येथेही मोफत तपासणी व औषधे दिली जातात. त्याचसोबत उत्तर गोव्यातील सरकारी आरोग्य केंद्रातही आठवड्यातील दोन दिवस रुग्णांची तापसणी केली जाते. कोरोनापूर्वी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनाच तपासणी करण्याचे प्रशिक्षण दिले होते, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT