Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात 932 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 172 रूग्णांची नोंद

गोव्याचा पॉझिटीव्हीटी रेट 11.9 टक्के

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज दिवसभरात 172 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 158 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आलाय. गोव्यात सध्याच्या घडीला 932 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील दोन दिवसांत गोव्यात एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सध्या गोव्याचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 11.9 टक्के एवढा आहे. विशेष म्हणजे गोव्याचा पॉझिटीव्हीटी रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 54 हजार 859 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 49 हजार 970 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे 3,957 रूग्ण दगावले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 1,446 प्रयोगशाळा नमुने तपासले आहेत.

देशात 13,272 कोरोना रूग्णांची नोंद, 36 मृत्यू

देशात देखील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 13,272 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 36 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 01 हजार 116 रूग्ण उपचाराधीन आहेत. देशात सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दिल्ली, पंजाब या राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रूग्ण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT