Harvalem Accident Dainik Gomantak
गोवा

'त्या' बाथरूमला गेल्या अन् घरावर कोसळलं संकट; हरवळेतील मळीक कुटुंबाने अनुभवाला रात्रीचा थरार

Harvalem Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय गुरुवारी रात्रौच्या सुमारास हरवळे येथील मळीक कुटुंबीयांनी घेतला.

Ganeshprasad Gogate

Harvalem Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय गुरुवारी रात्रौच्या सुमारास हरवळे येथील मळीक कुटुंबीयांनी घेतला. घडलेली घटना अशी की, मधलावाडा वरचे हरवळे येथील रवी मळीक यांच्या घरावर गुरूवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी रात्री सुकलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी पडून त्यांच्या घराचे, स्कुटरचे नुकसान झालेच पण या घटनेत सुदैवाने घरातील दोन महिला बालंबाल बचावल्या आहेत.

या घटनेसंबंधी सविस्तर माहिती अशी कि, रवी मळीक यांच्या मातोश्री राधिका मळीक (वय ७० वर्ष) या गुरुवारी रात्री बाथरूमला जाण्यासाठी म्हणून उठल्या आणि खोली बाहेर गेल्या त्याचवेळी त्याच्या घरालगत असलेल्या आंब्याच्या झाडाची भली मोठी फांदी राधिका आज्जी झोपत असलेल्या खोलीवर पडली.

या घटनेतील धक्कादायक गोष्ट म्हणजे ती झाडाची फांदी आणि फांदीच्या वजनाने मोडलेली छप्पराची कौले असे सगळे सामान थेट त्या आज्जीच्या कॉटवर पडला आणि तोही उशी ठेवण्याच्या ठिकाणीच. केवळ दैव बलवत्तर म्हणून या घटनेत राधिका राजाराम मळीक या वृध्देचे प्राण वाचले.

तर त्याचवेळी त्यांची सून राखी ह्यादेखील पाणी गरम करण्यासाठी म्हणून खोलीबाहेर येत होत्या. मात्र मोठा आवाज झाल्याने त्याही तिथून जलदगतीने घराबाहेर पडल्याने त्याही बालंबाल बचावल्या.

महत्वाचे म्हणजे राधिका आजी गेले 4 महिने अंथरुणाला खिळून होत्या. मात्र मागील आठवडाभरापासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊन त्या हिंडू-फिरू लागल्या होत्या.

या धक्कादायक घटनेत मळीक कुटुंबियांच्या घराचे नळे- पत्रे फुटून, वासे मोडून नुकसान झालेय. तसेच त्यांनी नवीनच घेतलेल्या दुचाकीचेही मोठे नुकसान झालेय. घटनास्थळी सरपंच, तलाठी यांनी भेट देत पाहणी केलीय. मात्र या घटनेतून मळीक कुटुंबीय अजूनही सावरले नाहीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT