Harmal Beach  Dainik Gomantak
गोवा

Harmal Beach: पर्यटकांना वाटते 'नको ते हरमल', व्यावसायिकांनी फुटपाथही बळकावले!

दैनिक गोमन्तक

Harmal Beach: हरमल येथील किनारी भागात सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरू आहे. पण याच काळात व्यवसाय वाढवण्याच्या हेतूने व्यावसायिकांनी पदपथही बळकावले आहेत. खुर्च्या,सामान व दुचाकी विक्रेते दुकानांपुढे ठेवत असल्याने, स्थानिकांना पदपथ असूनही रस्त्यावरून चालत जावे लागते.

पंचायतीने तसेच प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी समाज कार्यकर्ते उदय वायगंणकर यांनी केली आहे. लहान मूल कडेवर घेऊन काही महिला भीक मागतात, त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास त्या शिव्याही देतात. त्यांच्यावर कारवाई का होत नाही,असाही प्रश्‍न वायगंणकर यांनी केला.

गेली कित्येक वर्षे ह्या भागांत पंचायतीच्या धडक कारवाईमुळे व्यावसायिकांनी सहकार्य केले होते. त्यामुळे पदपथावर अतिक्रमणे बंद होती, त्यात दोन वर्षे कोविडच्या स्थितीने सर्वच व्यवसाय ठप्प होते,मात्र यंदा पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी संपूर्ण पदपथच बळकावला आहे.

कित्येकांनी भाजी,फळे,कपडे,बोर्डस,क्रेट्स आदी सामान तसेच खुर्च्या टाकून ऐटीत बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे लोकांना व पर्यटकांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी रस्ता अरुंद झाल्याचा दावा उदय वायगंणकर यांनी केला आहे.

पर्यटकांना वाटते ‘नको ते हरमल’!

किनारी भागांत स्थानिक लोकांनी आपली जागा भाडेपट्टीवर दिली असली, तरी त्यांना अवैध कृत्याची मोकळीक मिळू नये. बीच रस्ता खूपच अरुंद आहे, त्यातच पदपथही सामानाने व्यापल्याने लोकांना रस्त्यातून चालत जावे लागते, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

स्थानिकांकडून दुर्लक्ष होत असल्याने परप्रांतीय व्यावसायिक 'किंग' बनू पहात असल्याचे दिसून येते. किनाऱ्यावर फिरते विक्रेते, मसाज करणाऱ्या महिलांच्या वावरामुळे चोरीप्रकरणे वाढली आहेत. परिणामी 'नको ते हरमल' म्हणण्याची पाळी पर्यटकांवर आली आहे, असे उदय वायगंणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT