Goa: Harassment of women workers in Madkai  Dainik Gomantak
गोवा

मडकईत महिला कामगारांची सतावणूक, वाहनाची सोय नसल्याने धोका

औद्योगिक वसाहतीत महिला कामगारांना बारा तासांपेक्षा जास्त वेळ राबवून घेतले जात

दैनिक गोमन्तक

मडकई: मडकई (Madkai) औद्योगिक वसाहतीत सध्या अनागोंदी कारभार चालला असून, या प्रकाराकडे सरकारचे (Goa Government) दुर्लक्ष झाले आहे. या औद्योगिक वसाहतीतील कामगारांना सुविधा तर नाहीच, मात्र कामाच्या नावाखाली सतावणूक चालली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रशांत च्यारी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मडकई औद्योगिक वसाहतीत विशेषतः महिला कामगारांना बारा तासांपेक्षा जास्त वेळ राबवून घेतले जात आहे. सकाळी आलेल्या महिला रात्री उशिरा घरी परततात; मात्र त्यांना घरी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाहन सुविधा नसल्याने गैरप्रकार होण्याचा धोका मडकई नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मडकई औद्योगिक वसाहतीत स्थानिक, तसेच गोव्याबाहेरील सावंतवाडी, कारवार आदी ठिकाणच्या महिला व मुली कामाला येतात. गोव्याबाहेरील महिला कामगार या मडकई, तसेच लगतच्या गावात भाड्याने खोल्या घेऊन राहात आहेत. सकाळी कामाला गेल्यानंतर या महिला व मुली रात्री उशिरा घरी परततात. मडकई औद्योगिक वसाहतीतून होसोवाडा, दुतळे, कुंडई भागाला जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अंधार असतो. या मार्गावरच स्मशानभूमी असून तेथूनच बहुतांश मुली व महिला कामगार चालत जातात.

रात्रीच्या या महिला कामगार चालत अंधारातच आपल्या घरी जातात. या महिलांसोबत अन्य कुणी नसल्याने या महिलांबरोबर गैरप्रकार होण्याचा धोका आहे. वास्तविक या महिलांना रात्री उशिरापर्यंत कामाला थांबवून ठेवले जात असल्याने त्यांना रात्री घरी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था असायला हवी. मात्र मडकई औद्योगिक वसाहतीतील कारखाना व प्रकल्पातील कंत्राटदारांकडून या महिला कामगारांची सतावणूक केली जाते. दिवसभर बारा तासांपेक्षा जास्त काळ राबवून घेतले जाते. रात्री उशिरा कामावरून सोडतात.

यापूर्वी मडकई औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या महिला कामगारांचा विनयभंग होण्याबरोबरच मडकईतील तनुजा नाईक हिचा गोळी घालून खून करण्यात आला होता. या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

होसोवाडा दुतळे कुंडई रस्ता अंधारात!

मडकई औद्योगिक वसाहतीला जोडलेला होसोवाडा, दुतळे, कुंडई रस्ता पूर्णपणे अंधारात आहे. या रस्त्यावर पथदीप नसल्याने विशेषतः महिला कामगारांना रात्री अंधारातच चालत घर गाठावे लागते. बहुतांश महिला कामगार या मोबाईल टॉर्चवरच चालत जातात. पथदीप नसल्याने या ठिकाणी गैरप्रकार होण्याचा धोका असून, वीज खात्याने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी राजेश नाईक यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT