Goa Har Ghar Tiranga Rally Dainik Gomantak
गोवा

Har Ghar Tiranga: डिचोलीत ‘हर घर तिरंगा’ दुचाकी रॅली; मडगाव पोलिसांकडून जागृती

Goa Har Ghar Tiranga Rally: भारतमातेचा जयघोष करीत रॅलीच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’चा संदेश देण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोली भाजप मंडळ आणि युवा मोर्चातर्फे आयोजित ‘हर घर तिरंगा’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतमातेचा जयघोष करीत रविवारी (ता. ११) या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या रॅलीचा शुभारंभ केला.

यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक ॲड. रंजना वायंगणकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर, युवा मोर्चाचे अनिकेत चणेकर, वल्लभ साळकर, डॉ. शेखर साळकर,विश्वास गावस आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दुचाकी रॅलीत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. शहरासह डिचोली मतदारसंघात ही रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आदी घोषणा देत आणि भारतमातेचा जयघोष करीत रॅलीच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’चा संदेश देण्यात आला.

स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आज आम्ही स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. हुतात्म्यांचे स्मरण म्हणून प्रत्येकानी आपल्या घरावर तिरंगा फडकावून देशाभीमान जागृत ठेवावा, असे आवाहन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.

‘हर घर तिरंगा’अंतर्गत मडगाव पोलिसांकडून जागृतीचे आयोजन

स्वातंत्र्य दिनानिमित्त मडगाव पोलिस स्थानकातर्फे ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात मडगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक व शाळांना त्यांनी भेटी दिल्या. लोकांना स्वातंत्र्यदिनाचे महत्व पटवून देण्यात आले.

या दरम्यान मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक व त्यांच्या पोलिस स्टाफने आपल्या अधिपत्याखाली येत असलेल्या ज्येष्ठ नागरिक तसेच स्कूल मध्ये भेट देऊन १५ आॅगस्ट या दिनाविषयी माहिती दिली.यात मडगाव परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी तसेच शाळा, विद्यालयांमध्ये त्यांनी भेट दिली आणि या दिवसाचे महत्व पटवून दिले,असे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT