Narayan Gehlot & Nitesh Kumar Dainik Gomantak
गोवा

Goa: हणजुण पोलिसांची मोठी कारवाई; अखेर चोरटे गजाआड

या चोरट्यांना हणजुण पोलिसांनी (Hanjun Police) चिपळूण (महाराष्ट्र ) पोलिसांच्या सहाय्याने कारगाडी सहित ताब्यात घेतले.

दैनिक गोमन्तक

कुंभारवाडा-हणजुण येथील निलेश गोपीनाथ धारगळकर (Nilesh Gopinath Dhargalkar) यांच्या मालकीची स्विफ्ट कारगाडी पळवून महाराष्ट्र मार्गे कर्नाटकात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नारायण गेहलोत (Narayan Gehlot) (बेंगलोर )आणि नितेश कुमार (Nitesh Kumar) (बीजापुर ) या चोरट्यांना हणजुण पोलिसांनी (Hanjun Police) चिपळूण (महाराष्ट्र ) पोलिसांच्या सहाय्याने कारगाडी सहित ताब्यात घेतले. दरम्यान, अठ्ठेचाळीस तासांच्या आत पोलिसांनी ही मोहीम यशस्वी करून चोरट्यांना गजाआड करण्यात यश मिळविल्याबद्दल शिवोलीतील समर्थन संघटणेकडून हणजुण पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले  आहे. 

सविस्तर व्रुत्तानुसार, शनिवारी सकाळी गोव्यात (हणजुणात ) पर्यटक बनून आलेल्या संशयित नारायण गेहलोत आणी नितेश कुमार या कर्नाटकातील जोडगोळीने त्याचदिवशी सकाळी स्थानिक निलेश  धारगळकर यांच्या मालकीची स्विफ्ट कारगाडी ( क्र : जीए-03/डब्ल्यू 9382) एका दिवसाच्या करारावर भाडेपट्टीवर घेतली होती व दुसऱ्या दिवशी सदर कारगाडी परत करण्याचे आश्वासन धारगळकर यांना दिले होते. दुर्दैवाने ठरल्या करारानुसार संशयित जोडगोळीकडून दुसऱ्या दिवशी (रविवारी ) कारगाडी परत करण्यात न आल्याने गाडीचे मालक धारगळकर यांनी त्यांच्याशी मोबाईल वरुन संम्पर्क  करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सदर जोडगोळीकडून त्यांना मोबाइलवर प्रतिसाद न मिळाल्याने घाबरलेल्या धारगळकर यांनी गाडीत असलेल्या जीपीएस सिस्टीमद्वारा गाडीचा पत्ता लावण्याचा प्रयत्न केला असतां  सदरची स्विफ्ट कारगाडी गोव्याबाहेर पोहोचल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी क्षणाचाही विलंब न लावतां गाडीचे मालक निलेश धारगळकर यांनी स्थानिक हणजुण पोलिसांत याबाबतची रितसर तक्रार दाखल केली. दरम्यान, धारगळकर यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत हणजुण पोलिस स्थांनकाचे निरीक्षक सुरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर गवंडी यांनी महाराष्ट्रात बिनतारी संदेश पाठवून या घटनेची माहिती दिली असतां सरतेशेवटी चिपळूण पोलिसांकडून गोवा मुंबई हायवेवर  ही स्विफ्ट कारगाडी ताब्यात घेण्यात आली.

दरम्यान, हणजुण पोलिस स्थानकाचे हवालदार ज्ञानेश्वर गवंडी, कॉ. स्नेहल मळीक, सर्वेश सांळगांवकर, सिद्धेश नाईक, तसेच आदर्श नागवेंकर यांनी मंगळवारी (ता. 13 जुलै ) दुपारी चिपळूण पोलिसांकडून चोरीस गेलेल्या स्विफ्ट कारगाडीचा ताबा घेतला. दरम्यान, संशयित चोरटे नारायण गेहलोत तसेच नितेश कुमार ( कर्नाटक ) यांच्याही मुसक्या आवळल्या असून सध्या त्यांची दोन दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सुरज गांवस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT