Goa officer transfers Dainik Gomantak
गोवा

Goa News: शिरगाव चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची बदली

Lairai Devi Goa Stampede: शिरगाव येथील यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर गोवा सरकारने पारदर्शक चौकशीसाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

Pramod Yadav

पणजी: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या यात्रेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गिते, पोलिस अधीक्षक (SP) अक्षत कौशल, पोलीस उपअधीक्षक (Dysp) जिवबा दळवी आणि डिचोलीचे पोलिस निरीक्षक तसेच, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी यांची बदली केली आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेचा पारदर्शक आणि योग्य तपास व्हावा यासाठी ही बदली करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

शिरगाव जत्रेतील घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी दंडाधिकारी फॅक्ट फायन्डिंग समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल सचिव संदीप जेकस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीचा अहवाल उद्यापर्यंत (रविवारी) सादर करण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. घटनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उच्च स्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

गेल्या अनेक वर्षापासून शिरगावची यात्रा व्यवस्थित पद्धतीने पार पडत आहे. पण, अशा पद्धतीची घटना केव्हाच घडली नाही. या घटनेत कळत नकळत कोणी सहभाग दिसून आल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी देखील घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या प्रती आमच्या सहवेदना आहेत. चार कृटुंबियांच्या घरी मी भेट दिलीय.

मृत आणि जखमींना आर्थिक मदत

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांना सरकारच्या वतीने दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींना (रुग्णालयात असणारे) एक लाख रुपये मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT